श्रीरामपूर ( प्रतिनिधी ) - अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक व अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक विकास मंडळ या दोन्ही संस्थांच्या प्रगतीमध्ये जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्त शिक्षक बंधू भगिनींचे मोलाचे योगदान आहे. नव्हे त्यांनी निर्माण केलेल्या या संस्था आम्ही फक्त सांभाळण्याचे काम करतोय. त्यामुळे या संस्थांवर सेवानिवृत्त शिक्षकांचा पहिला हक्क आहे. जुन्या लोकांनी चांगल्या पद्धतीने या संस्था चालविल्या म्हणून त्यांची भरभराट झाली. आपण केलेले चांगले काम आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. सेवानिवृत्तांच्या कोणत्याही प्रश्नासाठी आम्ही सदैव पुढे राहू. आपण हक्काने आपले म्हणणे मांडावे.त्याची निश्चितपणे दखल घेतली जाईल व श्रीरामपूर शाखेची जुनी इमारत सेवानिवृत्त संघटनेस देण्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल असे प्रतिपादन शिक्षक संघ,गुरुमाऊली - सदिच्छा मंडळाचे नेते बापूसाहेब तांबे यांनी केले.

अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक विकास मंडळावर जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून विश्वस्तपदी बँकेचे माजी चेअरमन सलीमखान पठाण यांची निवड करून मंडळाने श्रीरामपूर तालुक्याला संधी दिल्याबद्दल श्रीरामपूर तालुका व नगरपालिका पेन्शनर शिक्षक संघटनेचे वतीने शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांचा पेन्शनर संघटनेच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना श्री तांबे बोलत होते.यावेळी शिक्षक बँकेचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब कापसे, शिक्षक संघाचे जिल्ह्याचे कार्यकारी अध्यक्ष नारायण पिसे, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे नेते सचिन नाबगे,शिक्षक नेते बाबाजी डुकरे, विकास मंडळाचे अध्यक्ष प्रदीप दळवी,शिक्षक बँकेचे माजी चेअरमन लहुजी कोल्हे, निवृत्त विस्तार अधिकारी जयराम दादा हळनोर,के टी निंभोरे, नगरपालिका पेन्शनर संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रताप देवरे, शहर अध्यक्ष प्रकाश माने, तालुका अध्यक्ष रावसाहेब पवार, अशोक बागुल, पाटीलबा खपके गुरुजी,राजू थोरात आदी उपस्थित होते.
श्री तांबे पुढे म्हणाले कि शिक्षक बँक व विकास मंडळ या दोन्ही संस्था जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांच्या आहेत.सेवानिवृत्त शिक्षकांनी या संस्थांसाठी दिलेले योगदान कोणीही विसरू शकत नाही.आपल्या पूर्वजांनी केलेल्या त्यागातून या संस्था निर्माण झाल्या आहेत. त्या चांगल्या प्रकारे सांभाळण्याची जबाबदारी जिल्ह्याने आमच्यावर दिली आहे आणि ती आम्ही पार पाडत आहोत.
तालुका व शहर पेन्शनर संघटनेने शिक्षक बँकेच्या जुन्या इमारतीची मागणी केली आहे. सदरची इमारत खूप जुनी झाली आहे. ती वापरात असणे गरजेचे आहे म्हणून ती पेन्शनर शिक्षक संघटनेस देण्याबाबत निश्चितपणे कार्यवाही करू असे आश्वासनही त्यांनी दिले. तालुका पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष रावसाहेब पवार यांनी बापूसाहेब तांबे यांच्यामध्ये कै.भा.दा. पाटील गुरुजी यांचे प्रतिबिंब पाहण्यास मिळते. ते सर्वांना सोबत घेऊन जिल्ह्यात काम करीत आहेत असे सांगितले.
प्रास्ताविक भाषणात नगरपालिका पेन्शनर संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रताप देवरे यांनी शिक्षक विकास मंडळावर सलीमखान पठाण यांच्यासारख्या अभ्यासू व्यक्तिमत्वास आपण संधी दिली व श्रीरामपूर तालुक्यातील सर्व सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान केला. त्याबद्दल गुरुमाऊली सदिच्छा मंडळ व मित्र पक्षांना धन्यवाद दिले.पेन्शनर शिक्षक संघटनेचे संघटक अशोक बागुल, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन लहुजी कोल्हे व पेन्शनर संघटनेचे तालुकाध्यक्ष रावसाहेब पवार गुरुजी यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करून तालुका पेन्शनर संघटनेच्या कामकाजाची माहिती दिली तसेच शिक्षक बँकेची जुनी इमारत पेन्शनर संघटनेस देण्याची आग्रही मागणी केली. यावेळी पेन्शनर संघटनेतर्फे बापूसाहेब तांबे तसेच आलेल्या इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास दिलीप फुलवर,भागाजी ठाणगे, शब्बीर शेख,चंद्रकांत हारके,किशोर आढाव, सुरेश कांबळे,सचिन शिंदे आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रताप देवरे यांनी केले तर आभार प्रकाश माने यांनी मानले.