महाविकास आघाडीचे उमेदवार श्री.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्याप्रसंगी ससाणे बोलत होते. यावेळी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर होते . यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनीही मतदानरुपी आशीर्वाद देण्याचे आवाहन केले.
ससाणे पुढे म्हणाले की, सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, खाजगीकरण, न्यायव्यवस्थेतील दबावतंत्र, फोडाफोडीचे राजकारण, सत्तेचा गैरवापर, यामुळे देशात भाजपा विरोधी लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे कोणत्याही भूलथापांना बळी न पडता देशाची लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून, एकदिलाने काम करा. यानंतर मा.नगराध्यक्ष संजय फंड म्हणाले की, देशाचे पंतप्रधान जनतेशी खोटे बोलून दिशाभूल करीत असून, देशात भाजपाच्या अनागोंदी कारभारामुळे अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे मोदींचे हुकूमशाही सरकार जनता घरी बसवल्याशिवाय राहणार नाही, अशी घनाघाती टीकाही फंड यांनी केली. यानंतर जी.प.चे माजी सभापती बाबासाहेब दिघे म्हणाले की,लोकशाही संपवणे हीच मोदीची गॅरंटी असून महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला पळवून ईडी, सीबीआय या यंत्रणांच्या माध्यमातून विरोधी पक्षांना धमकवण्याचे काम करत आहे. त्यामुळे महायुतीचे सरकार जनतेला मान्य नाही. यानंतर श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले म्हणाले की,भाजपा धर्माचे राजकारण करत असून जाती जातीमध्ये वाद निर्माण करत आहे. देशात काँग्रेसची लाट निर्माण झाली असून राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी भाऊसाहेब वाकचौरे यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करा.
यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले म्हणाले की, महायुतीचे खासदार मतदारसंघात कधी फिरकले नाही. शिर्डी लोकसभा मतदारसंघात विकासाची कामे नाहीत. त्यामुळे भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासारख्या अनुभवी व उच्चशिक्षित माणसाची गरज आहे.
यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन बडदे,तालुका अध्य्क्ष राधाकिसन बोरकर,लखन भगत,युवा सेंनेचे निखिल पवार, शहर अध्यक्ष रमेश घुले, आम आदमी पार्टीचे तिलक डुंगरवाल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव शेजूळ, शहराध्यक्ष लकी सेठी,संभाजी ब्रिगेडचे शिवाजी पवार,डाव्या पक्षाचे जीवनराव सुरडे,शेतकरी संघटनेचे बाळासाहेब पटारे यांनीही आपल्या भाषणातून मशाल या चिन्हा समोरील बटन दाबून मा.खा. भाऊसाहेब वाकचौरे यांना विजयी करण्याचे आव्हान केले आवाहन केले. या मेळाव्याप्रसंगी श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस, स्व.जयंतराव ससाणे मित्र मंडळ, श्रीरामपूर शहर काँग्रेस, काँग्रेसच्या सर्व सेलचे पदाधिकारी, युवक काँग्रेस,महिला काँग्रेस, राहुरी तालुक्यातील ३२ गावे, देवळाली प्रवरा,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, आम आदमी पार्टी, संभाजी ब्रिगेड, डावे पक्ष व शेतकरी संघटना आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी अनेक माजी नगरसेवक,बाजार समिती संचालक, सरपंच, सोसायटी चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य,व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.