श्रीरामपूर | कामगार रूग्णालयात नूतन कॅथलॅब, डायलेसिस, सोनोग्राफी व युरोलॉजी सेंटर सुरू


श्रीरामपूर :येथील साखर कामगार रूग्णालयात माईल स्टोन हेल्थ केअर एलएलपी व्यवस्थापित नूतन कॅथलॅब(cath lab),  डायलसिस, सोनोग्राफी व युरोलोजी सेंटर चे उद्घाटन प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या हस्ते पारपडले.

            कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी साखर कामगार ट्रस्टचे सचिव अविनाश आपटे होते तर मॅनेजिंग ट्रस्टी ज्ञानदेव आहेर, वैद्यकीय संचालक डॉ. रविंद्र जगधने, डॉ.कुमार चोथणी, डॉ.रविंद्र कुटे, डॉ. प्रफुल्ल देशपांडे, डॉ. दिलीप पडघण, डॉ.राजेंद्र गोंधळी, डॉ.प्रफुल्ल ब्रम्हे,  डॉ प्रदीप टिळेकर, डॉ.संजय शुक्ला, डॉ अक्षय शिरसाठ, डॉ अतुल कारवा, डॉ.संजय अनारसे, डॉ.ज्ञानेश्वर राहिंज, डॉ राहुल शेवाळे, डॉ.पीयुष बांठीया, डॉ.नीलेश सदावर्ते, डॉ.रविंद्र भिटे, डॉ मयूर कापसे, डॉ.मयूरेश कुटे, डॉ. समीर बडाख, डॉ. राजेंद्र चौधरी, डॉ.स्वप्नील नवले, डॉ.अथर्व आहेर, सेवा नर्सिंग कॉलेजचे अजमुद्दीन शेख, कांचन पाथरकर, नीलेश म्हस्के आदींची प्रमुख उपस्थीती होती.

            माईलस्टोन हेल्थ केयर डायरेक्टर व व्यवस्थापन डॉ. अमोल वालतुरे, डॉ विशाल लोढा व सौरभ पवार हे व्यवस्थापन बघणार असून यापुढील काळात महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतर्गत सद्य स्थितित मोफत डायलसिस सुरू असून लवकर अँजिओप्लास्टी, लहान मुलांचे हृदयाचे छिद्राचे ऑपरेशन, मुतखडयाचे ऑपरेशन या मोफत सुविधा उपलब्ध होणार आहे.  सदर सेवा देण्यासाठी नगर व नाशिक येथील प्रख्यात कार्डिओलोजिस्ट डॉ. श्रीधर बधे, डॉ. सुदाम जरे,  डॉ. सुनील दिघे, डॉ.आशीष चौधरी, डॉ अमित भराडीया डॉ. राहुल शेवाळे दररोज उपस्थित राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post