श्रीरामपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहीद दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी ससाणे बोलत होते. ससाणे पुढे म्हणाले की देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतीची मशाल हाती घेऊन आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या या क्रांतिवीरांच्या बलिदानामुळे स्वातंत्र्य चळवळीला नवी दिशा मिळाली.यावेळी शहीद भगतसिंग,राजगुरू व सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी जि प चे माजी सभापती बाबासाहेब दिघे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले, मा नगरसेवक दिलीप नागरे, के सी शेळके, आशिष धनवटे, सरवरअली मास्टर, अशोक जगधने, डॉ राजेंद्र लोंढे, सुरेश ठुबे, नवाज जहागीरदार, रितेश चव्हाणके, अमोल शेटे, नजीरभाई शेख, भगवान जाधव, बुऱ्हानभाई जमादार, बाबा वायदंडे, योगेश गायकवाड, युनुस पटेल, गणेश काते, लक्ष्मण शिंदे, विशाल साळवे, सुरेश बनसोडे, राजेश जोंधळे, कल्पेश पाटणी, सागर दुपाटी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.