श्रीरामपूर : अत्यंत रहदारीच्या असणाऱ्या संगमनेर रस्त्यावरील नांदूर शिवार परिसरात 'छावा ब्रिगेड'चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजेश शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे गतिरोधक टाकण्यात आले. स्पीड ब्रेकर टाकल्यामुळे गावाकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
संगमनेर नेवासा रस्त्यावर प्रचंड वाहतूक असल्यामुळे नांदूर परिसरातील ग्रामस्थ, शालेय विदयार्थी, वयोहृध्द नागरिकांचे जीवन धोक्यात आले होते. या ठिकाणी वाहनांची मोठी वर्दळ असते. पायी चालणे, दुचाकी वर मार्गक्रमण करणे जिकिरीचे झाले होते. वाहने भरधाव वेगात जात असल्यामुळे छोट्या मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढले होते.
छावा ब्रिगेडचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजेश शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम उपवीभागचे उप-अभियंता श्री गुंजाळ यांच्याकडे नांदूर-खंडाळा परिसरात गतिरोधक बसविण्याची मागणी केली होती. राजेश शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्यात आले.