विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बेकायदेशीर अतिक्रमणे काढण्यासंदर्भात आमरण उपोषण करण्याबाबत अधिकार नोटीसद्वारे नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना पत्र देऊन मागणी केली होती. मात्र तिची दखल न घेतल्या गेल्याने उपोषण सुरू करण्यात आले. मुख्याधिकारी यांनी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल थोरात यांना 19 जानेवारी 2024 रोजी पत्र देऊन कळविले की, रस्त्याचे दोन्ही बाजूच्या सीमा निश्चित करून अतिक्रमणासंदर्भात पंचनामे करून कायदा संस्थेचा भंग होणार नाही या अनुषंगाने शासकीय कार्यालयाचे सहकार्याने व अतिक्रमण पथक कार्यवाही करेल. यासाठी एक महिना कालावधी लागणार आहे त्यामुळे आपण उपोषण स्थगित करावे, अशी विनंती केली होती.
थोरात व कार्यकर्त्यांना यापूर्वी नगर परिषदेत केलेल्या पत्रव्यवरानुसार नगरपालिकेने अतिक्रमणे काढण्यासंदर्भात जी कारणे दर्शवली आहेत त्याची पूर्तता यापूर्वी झालेली आहे. उदाहरणार्थ कायदेशीर सल्ला, न्यायालयाचे आदेश तसेच मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी व सर्वोच्च न्यायालय आदरणीय अतिक्रमणे काढण्याचे आदेशाचे या सर्व गोष्टी नगरपालिकेस वेळोवेळी प्राप्त झालेले आहेत. तरीही मुख्याधिकारी शिंदे हे कार्यवाही करण्यात टाळताळ करीत असल्यामुळे दिनांक २५ पासून उपोषण करीत असल्याचे अनिल थोरात यांनी सांगितले.
निवेदनावर माजी नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, मोहन कुकरेजा, सूर्यकांत सगम, वनदेव सोनवणे, महेश गुप्ता, सचिन खर्डे, रामचंद्र आहुजा, अनिल आहुजा, वृषभ मुद्दा, शिवाजी पाटील, गोपाल झंवर, राजेश पटेल, माणिलाल पटेल, किशन पटेल, नवाज पठाण, रमेश लोढा, सतीश कुंकलोळ, सिद्धार्थ खर्डे, संदीप बडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.