श्रीरामपूर : शहराची बाजारपेठ मजबुत ठेवण्यासाठी छोट्या व्यापार्यांनी मालाची खरेदी शहरातील होलसेल व्यापार्यांकडून करावी, असे आवाहन हिंदसेवा मंडळाचे उपाध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष रविंद्र गुलाटी यांनी केले.
हिंद सेवा मंडळाच्या उपाध्यक्षपदी रविंद्र गुलाटी यांची निवड झाल्याबद्दल श्रीरापमपूर व्यापारी असोसिएशनच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. त्याचा सत्कार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष पुरूषोत्तम झंवर, उपाध्यक्ष बाळासाहेब खाबिया,सचिव प्रविण गुलाटी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी जेष्ठ पत्रकार रमेश कोठारी,शिवसेनेचे शहर संघटक संजय छल्लारे,मुळा प्रवराचे संचालक सिद्धार्थ मुरकुटे, नगरसेवक राजेश अलघ, भरत ओझा, जगदीश नारा, पुरुषोत्तम मुळे, रमेश गुंदेचा, विजय गांधी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना गुलाटी म्हणाले. शहराच्या बाजारपेठेची आर्थिक स्थिती मजबुत राहण्यासाठी शहरातील छोट्या व्यापार्यांनी मालाची खरेदी शहरातीलच होलसेल व्यापार्यांकडून करावी, तसेच मोठ्या व्यापार्यांनी छोट्या व्यापार्यांना साथ द्यावी.जेनेकरून शहरातील चलन शहरातच राहिल. त्यामुळे बाजारपेठेला चालना मिळेल. शहरातील व्यवहार, देवाण -घेवाण वाढण्यासाठी व्यापार्यांनी शहरातूनच ठोक माल खरेदी करणे गरजेचे आहे. मोठ्या ठोक होलसेल व्यावार्यांनी छोट्या व्यापार्यांना संभाळून घेत बाहेरील व्यापारी देत असलेल्या किंमतीतच किंवा सुट देण्यासाठीचे प्रयत्न करावे. म्हणजे शहरातील चलन बाहेर न जाता शहरातच राहिल. आम्ही केमिस्ट असोसिएशनच्या वतीने सुध्दा हे धोरण अवलंबले असून याचा चांगला फायदा शहरातील व्यापार्यांना होत आहे.
शहरातील सर्व व्यापारी, नागरिक यांच्या सहकार्यामुळेच मला वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या नेतेमंडळी सोबत काम करण्याची मोठी संधी मला मिळाली. त्याबद्दल मी, स्वतःला भाग्यावान समजतो. शिक्षण क्षेत्रातही चांगले काम करून दाखवू असे आश्वासनही त्यांनी दिले.
यावेळी रमेश कोठारी, रमेश गुंदेचा, संजय छल्लारे, सिद्धार्थ मुरकुटे, पुरूषोत्तम झंवर, प्रविण गुलाटी आदींची भाषणे झाली.यावेळी विजय गांधी, प्रविण बोरा, सुधीर वायखिंडे, शेखर दुबय्या, संजय कासलीवाल, राहुल कोठारी, दत्ता धालपे, अनिल लुल्ला, प्रेमचंद कुंकूलोळ, गौतम उपाध्ये, धर्मेश शाह आदींसह व्यापारी उपस्थित होते.