यासंदर्भात छावा मराठा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण कोल्हे, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सहसचिव संजय साबळे, सामाजिक कार्यकर्ते राजाराम शिंदे, तुषार तोरणे, 'साईकिरण टाइम्स'चे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते राजेश बोरुडे आदींनी पुणे येथील प्रधान मुख्य वनसंरक्षकांना निवेदन दिले आहे.
सामाजिक वनीकरण परीक्षेत्राचे श्रीरामपूर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी जयवंत वलवे व वनपाल एम. डी. कोळी यांनी मोठा भ्रष्टाचार करून पैसे वाटप केले असल्याची तक्रार केली व संबंधित पुरावे देऊनही विभागीय वन अधिकारी सचिन कंद यांनी त्यांची पाठराखण केली, त्यांना अभय दिले. दोषींवर कोणतीही करावाई केली नाही.
विभागीय वन अधिकारी सचिन कंद व सहाय्यक वनसंरक्षक परवीन पठाण भ्रष्ट अधिकाऱ्यांना चालना देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अहमदनगर सामाजिक वनीकरण विभागाला २०२० ते आजअखेरपर्यंत देण्यात आलेल्या निधी संदर्भात झालेल्या कामांची चौकशी करावी अशीही मागणी करण्यात आली आहे.