श्रीरामपूर : तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा नायगाव जुने शाळेत नुकताच आजी-आजोबा दिवस उत्साही वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायगावचे सरपंच राजाराम राशिनकर होते.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक संतोष वाघमोडे यांनी आजी-आजोबा यांचे कौटुंबिक जीवनातील महत्व सांगून नातवंडाच्या जीवन विकासात आजी-आजोबा यांचा मोलाचा वाटा असतो हे नमूद केले.सुरुवातीला सर्व आजी-आजोबांचे पुष्पवर्षाव करून विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी स्वागत केले.त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपापल्या आजी-आजोबांचे पाद्यपूजन व दर्शन घेऊन गुलाबपुष्प व फुलांचा हार घालून त्यांचा यथोचित सन्मान केला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने आजी-आजोबांना आपल्या जुन्या काळातील आठवणी जागृत झाल्या.सर्व आजी-आजोबांना गहिवरून आले.सर्वांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले.आपल्या नातवंडांनी केलेला यथोचित गौरव व शाळेने आयोजित केलेल्या स्तुत्य उपक्रमामुळे सर्वजण भावनिक झाले.यावेळेस आजी-आजोबांनी पहिल्यांदाच असा कार्यक्रम झाल्याबद्दल शाळेतील शिक्षक संतोष वाघमोडे व सुजाता सोळसे यांचे कौतुक केले.तसेच उपस्थित आजी-आजोबांनी कार्यक्रमाचे सुंदर आयोजन केल्याबद्दल शाळा विकासासाठी १९००/- रुपयांचे बक्षीस दिले.याप्रसंगी आजी-आजोबांची संगीत खुर्ची हा मनोरंजनात्मक खेळात सर्व आजी-आजोबांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन मनमुराद आनंद लुटला.विद्यार्थ्यांनीही आपल्या प्रेमळ आजी-आजोबा यांच्याविषयी माहिती दिली.कार्यक्रम प्रसंगी शिक्षणप्रेमी माता भगिनी सौ.नंदाबाई किसन दातीर यांनी शाळेतील सर्व विद्यार्थी व उपस्थित आजी-आजोबांना अल्पोपहार दिला.कार्यक्रमास उपस्थित पालक किरण दातीर, विश्वंभर दातीर यांनी आपल्या मनोगत आतून आजी-आजोबा मेळाव्याचे कौतुक केले.
सदर मेळाव्यास राजाराम राशिनकर,केशव नजन,संपत लांडे,अरुण राशिनकर,चंद्रहंस लांडे,रमेश दरेकर,चांगदेव राशिनकर,बलभीम लहारे,मच्छिंद्र लांडे,रायभान दरेकर,केशव नजन,बाजीराव भुसारी,नंदाबाई दातीर,मिराबाई तुपे,हिराबाई लांडे,नंदाबाई राशिनकर,मिनाबाई लांडे,लताबाई भुसारी,सिंधुबाई राशिनकर,परिगाबाई राशिनकर,तुळसाबाई नजन,इंदुबाई लांडे,तुळसाबाई लांडे आदी आजी-आजोबा तसेच निलेश लांडे,पूजा लांडे,भाऊसाहेब पवार,किरण दातीर,विश्वंभर दातीर आदी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी सुजाता सोळसे यांनी सर्वांचे आभार मानले.व जनसेवा मंडळाच्या वतीने ॲड.श्री प्रशांत राशिनकर यांनी वृत्तपत्राशी बोलताना या उपक्रमाबद्दल संस्कृतीची जोपासना करणारा व मराठी अस्मितेला वाव देणारा उपक्रम सध्याच्या शहरीकरणामुळे त्याचप्रमाणे विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आजी-आजोबांचे प्रेम नातवंडांना पूर्वीप्रमाणे मिळत नाही. मुलांचा मायेने सांभाळ करणाऱ्या आजी-आजोबांची माया – ममता मुलांना संस्कारित होण्यास फायदेशीर ठरते हे या निमित्ताने आपल्याला आधुनिक युगातील मुलांना दाखवून द्यायचे आहे. मुलांची जडणघडण होत असताना आजी आजोबांचे प्रेम मिळणे ही एक अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट असते. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्याची आवश्यकता असते. उपक्रम केल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष वाघमोडे सर व शिक्षिका सौ सुजाता सोळसे मॅडम यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात आले.