श्रीरामपूर : येथील कॉलेज रोडवर कर्मवीर भाऊराव पाटील यांचा अर्धाकृती पुतळा गेल्या अनेक वर्षापासून असून तेथे खासदार निधीतून श्रीरामपूर नगरपालिका अंतर्गत नगर विकास विभाग वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 12.5 उंचीचे लीड हायमास्ट गेली सहा महिन्यापासून बसवलेले आहे. ते काम कोणी केले त्या कामाचा उदो उदो करण्यासाठी त्या कामाचा तपशील काळ्या रंगाच्या बोर्डवर दर्शवले व त्या बोर्डाचा एक पाय कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मारकामध्ये आणि दुसरा पाय बाहेर रस्त्याला होता. ही बाब रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाषदादा त्रिभुवन यांच्या लक्षात येताच त्यांनी कार्यकर्त्यांना जमा करून त्या ठिकाणी आंदोलन करून स्मारकामध्ये मध्ये लावलेला तो बोर्ड त्वरित काढून संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करावी अन्यथा रिपाईच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडू, असा इशारा देताच मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी लगेच दखल घेऊन तो लावलेला काळ्या रंगाचा फलक बोर्ड त्वरित काढण्याच्या आदेश देऊन तो बोर्ड एका तासाच्या आत काढला.
संबंधित ठेकेदारावर कारवाईच्या आश्वासन दिले त्यावेळी रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन म्हणाले की 22 सप्टेंबर कर्मवीर भाऊराव पाटील अण्णांची जयंती आहे.तो लावलेला बोर्ड जयंतीच्या आदल्या दिवशी रिपाईच्याआंदोलनच्या रेट्यामुळे काढला. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. यावेळी रिपाईचे जिल्हा संघटक राजू नाना गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप, युवक शहराध्यक्ष विशाल सुरडकर, सनी बारशे संजय वाव्हाळ अर्जुन शेजवळ, नानासाहेब शिंदे उपस्थित होते.