भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते व उत्तर नगर जिल्हा भाजपाचे नवनिर्वाचित अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांचा सत्कार श्रीरामपूर करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर होते. याप्रसंगी प्रकाशअण्णा चित्ते, विनोद दळवी, मनोज ब्राह्मणकर, शशिकांत कडुस्कर, किरण लुणीया, बबन मुठे, संजय यादव, दीपक चव्हाण, वैशाली चव्हाण, देविदास चव्हाण, मदन चौधरी, अभिजीत कुलकर्णी, सोमनाथ पतंगे, सोमनाथ कदम , बाळासाहेब धनवटे , सुरेश आसने , कुंभार समाजाचे जिल्हाध्यक्ष भरत जगदाळे , शिवाजी वाकचौरे , ज्ञानेश्वर पेचे , बाळासाहेब क्षिररसागर आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या मनोगतात श्री गाते पुढे म्हणाले, संघर्षशील व निस्वार्थी कार्यकर्ता हीच भाजपची खरी ताकद आहे. असे कार्यकर्ते अनेक वेळा निवडणुकांमध्ये तिकीट मिळवण्यात कमी पडतात.अशा कार्यकर्त्यांच्या मागे त्यांच्यावर अन्याय होऊ नये, यासाठी मी भक्कमपणे उभा राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. कार्यकर्त्यांना येणारे वर्ष पक्षासाठी तन-मंन -धनाने योगदान देऊन अविरत परिश्रम करावे. पक्षाची ध्येयधोरणे व पक्षाचे काम जनतेपर्यंत पोहोचवावे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या देशाला विश्वगुरू बनविण्याच्या व देशाला स्वयंपूर्ण बनवण्याच्या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी बोलताना उत्तर नगर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील म्हणाले की उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस , प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , महसूल मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अत्यंत विश्वासाने हे जबाबदारीचे पद मला दिले आहे. येणारे वर्ष निवडणुकांचे आहे या काळात पक्षाला चांगले यश मिळवून देण्यासाठी सर्व नव्या जुन्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आपण प्रयत्न करणार आहोत. स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांनी सर्वप्रथम मला एकत्रित नगर जिल्ह्याच्या अध्यक्षपदावर काम करण्याची संधी दिली होती. त्यावेळी अनेक जुन्या कार्यकर्त्यांनी माझ्या बरोबर काम केलेले आहे. त्यांनांही बरोबर घेऊन काम करण्याचा माझा प्रयत्न राहील.
यावेळी ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांनी श्रीरामपूर तालुक्यात भाजपाचे काम उभे करताना केलेल्या संघर्षाची वर्तमान राजकीय स्थितीची माहिती दिली.
याप्रसंगी विनोद दळवी , बाळासाहेब गाडेकर , नारायण काळे , शशिकांतजी कडुस्कर , संतोष हारगुडे , सौ वैशाली चव्हाण आदींची भाषणे झाली. प्रदेशाध्यक्ष संजयजी गाते व विठ्ठलरावजी लंघे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल ,पुष्पहार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी ढोलीबाजाच्या व फटाक्यांच्या आकाशबाजीत सत्कार मूर्तींचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत अभिजीत कुलकर्णी यांनी केले .गणेश भिसे व संजय यादव यांनी अध्यक्षीय सूचना मांडली कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अजय नान्नोर यांनी व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश सोनवणे यांनी केले . या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप वाघमारे ,विजय लांडे ,सिद्धार्थ साळवे , विकी देशमुख ,रामदास धोत्रे , राजेंद्र पाटणी , अक्षय नागरे आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले .