संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथील चि. मंगेश पाराजी खिलारी यांनी यु.पी.एस.सी. परीक्षेत देशात ३९६ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होत यश मिळविल्याबद्दल सुकेवाडी येथे भव्य मिरवणूक व नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी आ. थोरात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार डॉ.सुधिर तांबे यांनी मंगेश चे वडील चहा ठेला चालवतात तर आई विडी कामगार असतांना त्याने अतिशय मेहनतीने यश मिळविल्याबद्दल कौतुक केले. माजी नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे यांनी आपल्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व विद्यालय यांना भविष्यात उत्तम भौतिक सुविधांसाठी एकजूट होऊन काम करायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली.
सुकेवाडी परिसराचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव कुटे व वसंत लॉन्सचे संचालक गोरखशेठ कुटे पाटील यांनी चि.मंगेश यांचा कौटूंबिक सत्कार केला.
यावेळी व्यासपीठावर सरपंच सौ योगिता सातपुते, उपसरपंच सुभाषराव कुटे, भागवत बाबा पतसंस्थचे चेअरमन सोपानराव कुटे, विविध कार्यकारी सेवा सोसायटी चे चेअरमन गोरख महादू सातपुते, दुधगंगा पतसंस्थेचे चेअरमन भाऊसाहेब कुटे, माजी पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते, माजी शिवसेना तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, शिवाजी खूळे, दादासाहेब कुटे , भारत सातपुते, निखील पापडेजा, गौरव डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तंटामुक्ती उपाध्यक्ष विलास कुटे यांनी सुत्रसंचालन सायखिंडी विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप सातपुते यांनी तर उपस्थितांचे आभार छावाचे कार्याध्यक्ष खंडू सातपुते यांनी मानले. आपल्या सत्काराला उत्तर देताना चि.मंगेश खिलारी याने आपला संघर्ष उपस्थितांसमोर मांडला यावेळी सुकेवाडी - खांजापूर परीसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते