केंद्रीय आरोग्य मंञी भारतीताई पवार यांच्या हस्ते श्रीमती लताबाई खेमनर यांना राज्यस्तरीय कृषिभूषण पुरस्कार प्रदान


श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्यातील फत्याबाद (चांडेवाडी ) येथील प्रगतशील शेतकरी स्व. पोपटराव खेमनर यांच्या पत्नी श्रीमती लताबाई पोपटराव खेमनर यांना डॉ. किसान बायो रिसर्च इन्सिट्युटचा सन 2023 चा राज्य स्तरीय कृषिभूषण पुरस्कार नाशिक येथिल यशवंत लाँन्स येथे केंदीय आरोग्य व कुटुब कल्याण मंञी सौ भारतीताई पवार, आमदार अँड राहुल ढिकले, आदर्श सरपंच भास्कर राव पेरे पाटील इफकोच्या संचालिका  साधनाताई जाधव आमची माती, आमची माणसे संपादक प्रा डॉ  संजय जाधव, मा. नगरध्यक्ष गणेश, धाञक नाम फाऊंडेशन योगेश म्हस्के पाटील अन्न महामंडळ,संचालक बापुसाहेब शिंदे  भारतीय जीव जंतु कल्याण बोर्डचे चेअरमन दताभाऊ खेमनर, डॉक्टर किसान किसान बायो रिचर्स इन्सिट्युट चे अध्यक्ष  डॉ सुनिल दिंडे संचालक सागर पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

 श्रीमती लताबाई पोपटराव खेमनर चे वय वर्ष ५८ आहे. आज ही त्या शेती करतात  त्यांनी अवघ्या दिड एकर मध्ये  ३९ पोते सोयाबीन तर एकर मध्ये २१ पोते गव्हाचे भरघोस उत्पन्न घेतले. आता त्याच्या शेतात दिड एकर उस आहे त्यांत त्यांनी तब्बल पाच अंतर्गत पिके घेतली होती.  त्याचे पती स्व पोपटराव खेमनर हे देखील सन 2016 - 2017 मध्ये  जिल्हा परिषद अहमदनर चा प्रगतशिल शेतकरी पुरस्कार घेतला होता. श्रीमती लताबाई खेमनर यांना कृषी भुषण पुरस्कार मिळाल्या बदल जिल्हा भरातुन त्यांचे अभिनंदन होत आहे. दैनिक खबरदार पुढारी संपादक दताभाऊ खेमनर यांच्या त्या मातोश्री आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post