श्रीरामपूर : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हजरत सैलानी बाबा दरबार यांचा जश्ने सैलानी उरूस शरीफ उद्या रविवारपासून चार दिवस साजरा केला जाणार आहे. रविवारी ( दि.३० ) हजरत सैलानी यांच्या उरसानिमित्त भव्य संदल मिरवणूक सायंकाळी ४ वाजता हजरत सैलानी बाबा दर्गा पासून निघणार असून यावर्षीची संदल मिरवणूक खूप आगळे आणि वेगळी असणार आहे.
चाळीस फुटी ट्रॉलीवर मुंबईचा जगप्रसिद्ध ब्लू बॉईज बॅण्जो बॅन्ड सोबत बुलढाणा येथील सुप्रसिद्ध ४० नगाडे असलेला वाद्यवृंद राहणार आहे. ही मिरवणूक मेन रोड, छत्रपति शिवाजी रोड मार्गे परत सैलानी दरबार येथे येणार असून रात्री दहा वाजता संदल चढविण्यात येणार आहे. सोमवार १ मे २०२३ रोजी सुप्रसिद्ध कव्वाल छोटा मजीद शोला व मंगळवार २ मे २०२३ रोजी सुप्रसिद्ध कव्वाल रईस अनिस साबरी यांचा कव्वालीचा कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता होणार आहे. बुधवार ३ मे २०२३ रोजी भव्य महाप्रसादाचे आयोजन दुपारी १२ ते ५ वाजे पर्यंत करण्यात आले आहे. तरी सदरच्या सर्व कार्यक्रमास सर्व धर्मिय भाविकांनी उपस्थित संदल,उरूस व महाप्रसादाचा कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन हजरत सैलानी बाबा उर्स कमिटी श्रीरामपूरच्या वतीने करण्यात आले आहे.