डॉ वंदना मुरकुटे यांनी घेतली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट; खंडाळा येथील घटनेकडे वेधले लक्ष


अहमदनगर : पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ.वंदना मुरकुटे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांची अहमदनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली . यावेळी श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे झालेल्या २ वर्षांच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराकडे लक्ष वेधुन सदर प्रकरण फास्ट ट्रॅक  कोर्टाकडे चालविण्यासाठी राज्य महिला आयोगाने पुढाकार घेण्याची विनंती केली. 

       तसेच महिला व युवतींसाठी शासनाच्या विविध योजना तळागाळा पर्यंत पोहचविण्यासाठी तसेच महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करणे अशा लोकहिताच्या  योजना आणण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती डॉ.मुरकुटे यांनी केली.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post