संगमनेर : तालुक्यातील सायखिंडी येथील श्री मनोहर बाबा विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप भानुदास सातपुते यांना नुकताच राष्ट्रीय योगा, प्राणायाम व हिंदी विषयासह सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक डॉ. बी.जी. शेखर पाटील साहेब यांच्या हस्ते राष्ट्रबांधणीचे शिल्पकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
इनर व्हिल क्लब ऑफ संगमनेर यांच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गुरूजनांचा सन्मान सोहळा पार पडला.
कार्यक्रम प्रसंगी प्रास्ताविक इनरव्हिल क्लब संगमनेर प्रेसिडेंट सौ. वृषाली कडलग यांनी अतिथी परिचय परफेक्ट फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष सौ सुनिता कोडे यांनी केले. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ सुधीर तांबे, गटशिक्षणाधिकारी श्रीमती सुवर्णा फटांगरे, इनरव्हिल क्लब जील्हा अध्यक्ष सौ. रचना मालपाणी, काजळे ज्वेलर्स चे संचालक ज्ञानेश्वर काजळे आदी मान्यवर उपस्थित होते.