श्रीरामपूरच्या जडणघडणीत पत्रकारांचे मोलाचे योगदान - ससाणे


श्रीरामपूर : श्रीरामपूरच्या जडणघडणीत पत्रकारांचे मोठे योगदान असून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी पत्रकारांची महत्त्वाची भूमिका असल्याचे जिल्हा बँकेचे संचालक, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी म्हटले आहे.
श्रीरामपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त आयोजित पत्रकार बांधवांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. ससाणे पुढे म्हणाले, स्व.जयंतराव ससाणे साहेब व पत्रकार बांधवांचे मित्रत्वाचे संबंध होते व त्यांनी पत्रकारांचा सन्मान करण्याची प्रथा सुरू केली. यानंतर  माजी नगराध्यक्ष संजय फंड यांनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव करत पत्रकार म्हणजे समाजासमोरील विचारांचा आरसा असल्याचे म्हटले. पत्रकार बांधवांनी सकारात्मक गोष्टी माध्यमांद्वारे समाजापुढे आणल्या पाहिजेत असेही ते म्हणाले. काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे  म्हणाले, लोकशाही समोर अनेक आव्हाने असून ही आव्हाने संपुष्टात आणण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. सामाजिक प्रश्नांना न्याय देण्याचे काम पत्रकारच करू शकतात असेही छल्लारे पुढे म्हणाले.

याप्रसंगी जेष्ठ पत्रकार रमण मुथा, रमेश कोठारी, पद्माकर शिंपी, नागेश सावंत, करण नवले, मनोज आगे, ज्ञानेश्वर गवले, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब भांड यांनी पत्रकारितेचे महत्त्व सांगीतले व स्व. ससाणे साहेबांच्या अनेक आठवणींना उजाळा देत आपली मनोगते व्यक्त केली. तसेच पत्रकारांचा सन्मान केल्याबद्दल करण ससाणे यांना धन्यवाद दिले. या कार्यक्रम प्रसंगी मा नगराध्यक्षा राजश्रीताई ससाणे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डावखर, जि. प. चे मा.सभापती बाबासाहेब दिघे, बाजार समितीचे मा. संचालक सुधीर नवले, मा.नगरसेवक सुनील बोलके, श्रीनिवास बिहानी, रितेश रोटे, दिलीप नागरे, दत्तात्रय सानप, महंता यादव, के सी शेळके, सुहास परदेशी,  संगीताताई मंडलिक, भारतीताई परदेशी, अशोकराव जगधने, प्रवीण नवले, डॉ.लोंढे, संजय गोसावी, सुरेश ठुबे, सरबजीतसिंग चूग, रितेश चव्हाणके ,सनी मंडलिक,युनुस पटेल, सुरेश शिंदे, जावेद शेख, सुनील साबळे, रियाज खान पठाण, राहुल शिंपी, वैभव पंडित, गणेश काते, निलेश भालेराव, योगेश गायकवाड, सुभाष अनाप, दिलीप तांबे, गोपाल भोसले, शाहरुख शेख, विशाल साळवे, कृष्णा पुंड, कल्पेश पाटणी, अमोल चिंतामणी, अंबादास निकाळजे, राजेश जोंधळे, पवन पाऊलबुद्धे, आकाश जावळे आदी मान्यवर तसेच श्रीरामपूर शहर व तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अजय धाकतोडे यांनी केले.


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post