हिंदुत्वाची आणि मराठी अस्मितेची जाणीव करून देणारे अग्निकुंड म्हणजे बाळासाहेब ठाकरे ; शिवसेना शहरप्रमुख सचिन बडदे


श्रीरामपूर : हिंदुहृदयसम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे तसेच नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्ताने आज श्रीरामपूर शिवसेनेतर्फे दोन्ही महान पुरुषांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

 त्यावेळेस शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन बडदे यांनी सांगितले की या दोन महान व्यक्तींचा जन्म एका दिवशी होणे हे आपले परम भाग्यच. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा आणि मराठी अस्मितेचा अग्नि कुंड पेटवला त्यांचे आचार विचार हे अनादी काळापर्यंत जिवंत राहणारच आहे पण त्यासाठी आपणही प्रयत्न करणे गरजेचे आहे याच विचारांनी आपले पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे पुढे काम करत आहे आज काळ कठीण असला तरी भविष्यकाळ हा आपलाच आहे कारण सूर्य कोणीही झाकायचा प्रयत्न केला तरी तो कधीही झाकला जात नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.

माजी आमदार भाऊसाहेबाजी कांबळे, शिवसेना शहर प्रमुख सचिन बडदे ,जिल्हा संघटक डॉ.महेश क्षीरसागर, शिवसेना नेते राधाकिसन बोरकर महिला आघाडी तालुकाप्रमुख शारदाताई कदम युवासेना शहर प्रमुख निखिल पवार उपतालुकाप्रमुख एकनाथ गुलदगड,उप शहर प्रमुख रोहित भोसले, उपशहर प्रमुख रमेश घुले, वाहतूक सेना शहर प्रमुख यासिन सय्यद, विभाग प्रमुख किशोर फाजगे, बेलापूर शहर प्रमुख लखन भगत, व्यापारी आघाडी जिल्हाप्रमुख रामा अग्रवाल ,उप शहर प्रमुख प्रवीण शिंदे,विभाग प्रमुख सुनील फुलारे, आबा बिरारी अजित गुंजाळ,हेमंत मुसमाडे,पादिर साहेब, जालिंदर करपे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post