श्रीरामपूर ( गौरव डेंगळे ) : शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बऱ्याच युवकांचा कल हा नोकरीकडे असतो, मात्र यामुळे व्यवसायात, छोट्या- मोठ्या उद्योगात असलेल्या संधी गमावतो. केवळ नोकरीच्या मागे न धावता उघड्या डोळ्यांनी उद्योगाच्या संधींकडे बघितले पाहिजे.युवकांनी व्यवसायात ,व्यापारात भाग घेतला पाहिजे,तसेच युवकांनी निर व्यसनी बनले पाहिजे असे प्रतिपादन ह भ प बाळासाहेब महाराज रंजाळे यांनी रॉयल्स मेन्स वेअर या कापड दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावातील उच्चशिक्षित युवक अक्षय डेंगळे व गौरव ढोकचौळे नोकरीच्या मागं न लागता आपला स्वतःचा व्यवसाय म्हणून रॉयल्स मेन्स वेअर कापड दुकानचा श्री गणेश करण्याचा ठरवले व या दालनाचे आज उद्घाटन ह भ प बाळासाहेब महाराज रंजाळे, ह भ प माऊली महाराज गुंजाळ यांच्या हस्ते झाले.
यावेळी श्रीरामपूर शहरातील राजकीय क्षेत्र,शैक्षणिक क्षेत्र,क्रीडा क्षेत्र, सामाजिक क्षेत्र,पत्रकारिता क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र आदी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून युवा उद्योजकांना प्रोत्साहन व शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्ह्यातील प्रसिद्ध वाय जे अँकरिंगचे प्रियांका यादव यांनी केले.