हिंद सेवा मंडळ प्रगतीत दत्तात्रय साबळे यांचे भरीव योगदान - संजय जोशी; भि.रा. खटोड कन्या विद्यालयाच्या चेअरमनपदी दत्तात्रय साबळे यांची नियुक्ती


श्रीरामपूर : येथील स्वर्गवासी दादा वामनराव जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली या श्रीरामपूर शहरांमध्ये हिंद सेवा मंडळाच्या उन्नतीत आणि विकास घडवून आणण्यात दत्तात्रेय साबळे यांचा मोलाचा वाटा असून त्यांचा या भरीव योगदानामुळेच त्यांना भि. रा. खटोड कन्या विद्यालयाचे चेअरमन पदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे प्रतिपादन हिंद सेवा मंडळाचे मानस सचिव संजय जोशी यांनी केली आहे.  

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी मावळते चेअरमन अशोक उपाध्ये यांच्या हस्ते नूतन चेअरमन दत्तात्रय साबळे यांना मंडळाचे नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी मंचावर सहसचिव रणजित श्रीगोड, ज्युनिअर विभागाचे चेअरमन गणेश देशपांडे ,स्कूल कमिटी सदस्य डॉक्टर गोरख बाराहाते, दत्तात्रय काशीद, अरुण धर्माधिकारी, मनसुख टक्कर, सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश कदम, दिलीप जोशी, प्राचार्य सौ. विद्या कुलकर्णी, पर्यवेक्षीका सौ. अनिता शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी सहसचिव रणजित श्रीगोड म्हणाले की मानद सचिव संजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रय साबळे खटोड कन्या विद्यालयाच्या विकासात निश्चित मोलाची भूमिका निभवतील या अगोदर तीन वेळा हिंद सेवा मंडळाचे संचालक म्हणूनकार्यरत होते सोमय्या स्कूलचे चेअरमन पद दहा वर्ष संभाळण्याचा त्यांचा अनुभव मंडळाला फायदा होईल.

प्राचार्य विद्या कुलकर्णी यांनी विद्यालयाच्या प्रमुख या नात्याने नूतन चेअरमन यांचे स्वागत केले शाळेच्या विकास कामि सहकार्याची भूमिका घेतली जाईल असा विश्वास व्यक्त केला  या वेळी विद्यालाच्या वतीने पुष्पहार व शाल देऊन सत्कार करण्यात आला.              

सत्काराला उत्तर देताना दत्तात्रय साबळे म्हणाले की स्वर्गवासी दादा जोशी यांचे माझ्यावर खूप प्रेम होते त्यावेळी चंद्रकांत सगम, अनिल देशपांडे व मी आम्ही दादांच्या खांद्याला खांदा लावून हिंद सेवा मंडळाच्या विकासातच्या वाटचालीस सहभागी झालो माझ्यासारख्या आसंख्या समाजातील कार्यकर्त्याला पुन्हा संधी दिल्याबद्दल त्यांनी मानस सचिव तसेच हिंद सेवा मंडळाचे संचालक मंडळाचे धन्यवाद मानले मागील काळात भौतिक सुविधा पत्राशेड दुरुस्ती सह होमसायन्स  विभागा नावाने कार्यरत करण्यासाठी प्रयत्नशील राहू ,असे त्यांनी नमूद केले. 

 यावेळी सेवक प्रतिनिधी आदिनाथ जोशी, सकाळ विभाग शिक्षक प्रतिनिधी केतनकुमार वाजे, विद्यार्थिनी प्रतिनिधी कुमारी नम्रता शेंगाळ, प्राची ढोकचौळे सह सकाळ, दुपार व ज्युनिअर विभागाचे सर्व शिक्षक व सेवाकव्रुंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सतीश म्हसे तर आभार व सौ.कल्पना जायभार यांनी मानले.          


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post