दुरदर्शी विकासाचे मॅाडेल तयार करा, निधीची जबाबदारी माझी- ना.विखे पाटील, जेष्ठ नागरिक सन्मान सोहळा : खोरेंनी दुरदर्शी विकासकामे करण्याची जबाबदारी खांद्यावर घ्यावी, निधी कमी पडू देणार नाही

मोरया फाऊंडेशन आयोजित ज्येष्ठ नागरीक सन्मान सोहळ्यात ज्येष्ठ नागरीकांचा सन्मान करताना महाराष्ट्र राज्याचे महसुलमंत्री, अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील, मोरया फाऊंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे, जिल्हा नियोजन समिती सदस्या स्नेहल खोरे व ज्येष्ठ नागरीक दिसत आहेत


  • जेष्ठ नागरिक सन्मान सोहळा
  • खोरेंनी दुरदर्शी विकासकामे करण्याची जबाबदारी खांद्यावर घ्यावी, निधी कमी पडू देणार नाही

श्रीरामपूर : शहरातील प्रभाग क्रमांक १६ मधील मोरया फाऊंडेशन आयोजित ज्येष्ठ नागरीक सन्मान सोहळा व विविध विकास कामांचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे महसुल, दुग्धविकास, पशुसंवर्धन मंत्री, अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी भाजप जिल्हा संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, तालुकाध्यक्ष दिपक पटारे, गिरीधर आसने, शरद नवले, प्रकाश चित्ते, मारुती बिंगले, शशिकांत कडुस्कर, पोलीस उपअधीक्षक संदिप मिटके, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसिलदार प्रशांत पाटील, मुख्याधिकारी गणेश शिंदे, जिल्हा नियोजन समिती सदस्या स्नेहल केतन खोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मोरया फाऊंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांच्या संकल्पनेतून पार पडलेल्या ज्येष्ठ नागरीक सोहळ्यात बोलताना ना.विखे पाटील म्हणाले की, श्रीरामपूर शहराच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेल्या ज्येष्ठ नागरीकांचा सन्मान करणे ही कौतकास्पद बाब आहे. मागील पिढीचे मार्गदर्शन घेऊन केतन खोरे व स्नेहल खोरेंनी दुरदर्शी विकास कामे करण्याची जबाबदारी खांद्यावर घ्यावी त्यासाठी लागणारा विकास निधी कमी पडू देणार नाही. रचनात्मक पद्धतीने कार्य करून शहराच्या विकासात भर घालणा-या नागरीकांना एकत्र करत शहर विकासाचे मॅाडेल तयार करण्याची खोरेंना सुचना ना.विखे यांनी केले. प्रास्ताविकात केतन खोरेंनी शहरातील रेंगाळलेल्या भुयारी गटार योजनेच्या दक्षिण एसटीपी प्लॅंटच्या जागेचा प्रश्न, पुर्णवादनगर परीसरातील आरक्षणाचा प्रश्न तसेच शेजारील ग्रामीण हद्दीतील रामचंद्रनगर, भोंगळ वस्ती, बोंबले नगर येथील विविध समस्यांचे निराकरण करण्याची मागणी विखेंकडे केली. 

माजी नगरसेविका सौ.स्नेहल केतन खोरे यांच्या पाठपुराव्याने मंजूर झालेल्या दक्षिणमुखी हनुमान मंदीर रस्ता, उत्सव मंगल कार्यालय ते रामचंद्र नगर रस्ता, महाले पोदार स्कुल समोरील भोंगळ वस्तीकडे जाणारा रस्ता, प्रकाशनगर अंतर्गत रस्ते, पटेल हायस्कुल परीसरातील रस्त्याच्या विविध विकास कामांचा शुभारंभ ना.विखे साहेबांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष सतीश सौदागर, माजी नगरसेवक दिपक चव्हाण, विजय आखाडे, अनिल थोरात, शंतनू फोफसे, नितीन भागडे, तुषार चांडवले, किशोर झिंजाड, विजय पाटील, विशाल रुपनर, ऋषीकेश खोरे, सोमनाथ लाड, राजू लाड, चेतन लोंढे, राजश्री होवाळ, सिमा पटारे, श्रद्धा खैरनार, कुणाल दहीटे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, ज्येष्ठ नागरीक, महीला भगिनी, युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post