गौण खनिजाच्या उत्खन्न व वाहतुकीचा परवानासाठी आवाहन


अहमदनगर : मुरुम व माती या गौण खनिजाच्या उत्खन्न व वाहतुकीचा परवाना प्राप्त करुन घ्यावयाचा असल्यास ज्या गटात मुरुम व माती उपलब्ध आहे. त्या क्षेत्राच्या तहसीलदार यांच्याकडे अर्ज करावा. असे आवाहन जिल्हा खनिकर्म अधिकारी वसीम सय्यद यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.  

अर्जासमवेत आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर सदरचे क्षेत्र हे जिल्हा खनिज योजनेमध्ये समाविष्ट करणेबाबतची कार्यवाही झाल्यानंतर शासकीय तरतुदीनुसार तात्पुरता उत्खनन परवाना देण्यात येईल. प्रस्तावाकरीता आवश्यक असणाऱ्या कागदपत्राची यादी संबंधित तहसिल कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तसेच www.ahmednagar.nic.in वर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. गौण खनिजाचा खरेदी / विक्री व वापर करणाऱ्या सर्व नागरिकांना व व्यावसायिकांना हे आवाहन करण्यात आले आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post