पोलीस व सामजिक कार्यकत्यांच्या दक्षतेमुळे बालविवाह रोखला


हरेगाव : श्रीरामपूर तालुक्यातील हारेगाव येथे अल्पवयीन मुलीचा होणारा बाल विवाह  पोलीस व सामजिक कर्यकत्याच्या दक्षतेमुळे रोखण्यात आला.

 याबाबत सविस्तर माहिती अशी की, हरिगाव येथे नगर येथील अल्पवयीन मुलीचा विवाह घोडेगाव येथील मुलाशी हरेगाव या ठिकाणी मुलीच्या मामाच्या दारात होत असल्याचे समजताच उंदींरगावचे उपसरपंच रमेश गायके यांना समजतात त्यांनी पत्रकार फिलीप पंडित यांच्याशी संपर्क साधत पोलीस मित्र ढवळे यांच्यासह घटनास्थळी भेट दिली. त्यांनी मुलीच्या आई-वडिलांसह मुलांकडे लोकांशी चर्चा केली असता त्या ठिकाणी साखरपुडा होत असल्याचे सांगितले. तसेच हरेगाव आऊट पोस्टचे पोलीस नाईक ए डी पवार यांनी  पोलीस निरीक्षक थोरात यांचा मार्गदर्शन खाली घटनास्थळी येऊन मुलीच्या घरच्यांना बालविवाह कायद्याविषयी माहिती दिली. त्यांना बालविवाह करण्यापासून रोखले.   पोलीस स्टेशनला  बोलावून त्यांच्याकडून त्याबाबत लेखी जबाब घेण्यात घेण्यात आला. पोलिसांना बघताच कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी अमीनभाई शेख सामाजिक कार्यकर्त्या शीला खरात, ग्रामपंचायत सदस्य  विशाल गायकवाड यांनी अल्पवयीन मुलीचा होणारा विवाह थांबविण्यास मोलाचे सहकार्य केले. यावेळी पोलीस वाहन चालक चाँद शेख उपस्थित होते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post