श्रीरामपूर | 'भीम गर्जना' सामाजिक संघटनेचा दणका; संगमनेर रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याबाबत व्यवसायिकांना 'नोटीस'


श्रीरामपूर : शहरातील संगमनेर रोडवरील अतिक्रमण ३ दिवसात हटविण्यात यावे, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस पालिका प्रशासनाने व्यवसायिकांना धाडली आहे. 'भीम गर्जना' संघटनेचे संस्थापक फिरोजभाई पठाण यांनी संगमनेर रस्त्यांवरील अतिक्रमण त्वरित हटवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता. याबाबत 'साईकिरण टाइम्स'ने  'श्रीरामपुरात अजून किती जीव जाणार?? रस्त्यावरील अतिक्रमन त्वरित हटवा; 'भीम गर्जना' संघटनेचा आंदोलन छेडण्याचा इशारा' या मथळ्याखाली २१ नोव्हेंबर रोजी वृत्त प्रसारित केले होते. ही बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. या ठिकाणी नुकताच एका युवकाचा मृत्यू झाल्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. याबाबत 'भीम गर्जना' संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. 

'भीम गर्जना' सामाजिक संघटनेच्या आंदोलनाच्या इशाऱ्याच्या दणक्यामुळे अतिक्रमण काढण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. भीम गर्जना संघटनेच्या वतीने पालिकेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी व मुखयाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, श्रीरामपूर शहरातील संगमनेर रोडवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून रस्त्यालगत वाढलेल्या अतिक्रमणामुळे दररोज छोटे-मोठे अपघात होतात आणि निष्पाप लोकांचा जीव देखील जातो. नॉर्दन ब्रांच ते दत्तनगर टपरी धारकांनी अतिक्रमण केलेले असून रस्त्याच्या कडेला गाड्या लावल्या जातात. गाड्यांचे काम देखील रस्त्यावरच केले जाते. त्यामुळे रस्त्यावरून होणाऱ्या वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होतो. येथे नुकताच एका युवकाचा अपघात होऊन जीव गेल्याची घटना घडलेली आहे. हा अपघात रस्त्यालगत झालेल्या अतिक्रमणामुळे झाल्याचे निदर्शनात येते. अतिशय वर्दळीचा रस्ता असताना अनेक व्यापारी आणि गॅरेज व्यवसायीकनी आपले दुकाने दहा ते पंधरा फूट पुढे आणल्याने त्यांच्याकडे येणारी ग्राहक रस्त्यावर गाड्या लावत असल्यामुळे यापूर्वीही अनेक छोटे मोठे अपघात होऊन अनेक नागरिकांना आपला जीव गमवा लागला आहे.  तरीदेखील प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची कोणतीही दखल घेतलेली नसून पुढील दहा दिवसांच्या संपूर्ण संगमनेर रोडवरील अतिक्रमण तत्काळ काढण्यात यावी, अन्यथा भीम गर्जना सामाजिक संघटनेच्या वतीने विविध प्रकाराचे आंदोलन उपोषणे रस्ता रोको करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या होत्या.



Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post