श्रीरामपूर : 'भीम गर्जना' सामाजिक संघटनेच्या वतीने भारतीय संविधान गौरव दिनानिमित्त अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. त्यावेळी श्रीरामपूर शहरातील डीडी काचोळे माध्यमिक विद्यालयातील वसतिगृह च्या विद्यार्थ्यांना अल्पहार व फळे वाटप करून साजरा करण्यात आला.
भारतीय संविधानाचे व संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज भाई पठाण, संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष लहानु भाऊ त्रिभुवन, माजी नगरसेवक शाम अढागळे, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष रफिक शहा, तालुका उपाध्यक्ष सोनू शेख, तालुका सचिव मुनाफ पिंजारी, श्रीरामपूर युवक शहराध्यक्ष रफिक पठाण, रविंद्र धिवर, युसुफ भाई शेख, अमोल वायकर, राजु धिवर, अजय मगर, वसीम शेख, नदीम शेख, शब्बीर भाई पिंजारी सर्वच कार्यकर्ते उपस्थित होते.