आयुष्यात हरणारे कधीच हरत नसतात तर हार माननारे हरतात ; स्वप्नील लांडे


श्रीरामपूर : लहानपणी मी भरपुर क्रिकेट खेळायचो व त्यातून एक गोष्ट शिकलो की कधी कधी आपल्याला माहिती असत की आपण हरणार आहोत तरी सुद्धा शेवटच्या चेंडूपर्यंत खेळावं लागत आणि कधी कधी त्या प्रयत्नांमध्ये सुद्धा एखादा नो बॉल पडून दिखील यश मिळू शकत.

आयुष्यातही असच असत मित्रांनो आपण हरलोय किंवा हरत आहोत असं माहिती असताना सुद्धा शेवटच्या श्वासापर्यंत खेळणे गरजेचं असत काय माहिती कधी बाजी पलटुन जाईल आणि आपले अपयश यशामध्ये बदलून जाईल असे प्रतिपादन ग्रॅज्युएट व लस्सीचे संचालक स्वप्निल लांडे यांनी श्रीरामपूर सुपर सिक्स क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी केले.

यावेळी सार्थक बहुउद्देश्य संस्थेचे अध्यक्ष उमेश तांबडे, साई इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या अस्मिता गायकवाड,हेमंत सोलंकी, दिगंबर पिनाटे,एस सोनवणे,शुभम पवार,तुषार पवार, अस्मिता परदेशी,अतुल जाधव,अमोल शिरोळे,दौलत पवार, वैष्णवी इंगळे स्पर्धा आयोजक गौरव डेंगळे, नितीन गायधने, नितीन बलराज तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.

आज झालेल्या अंतिम सामन्यात साई इलेव्हन संघाने बेलापूर फायटर संघाचा ४ गडी राखून पराभव करून ५ व्या श्रीरामपूर सुपर सिक्स क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

श्रीरामपूर फायटर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी  करण्याचा निर्णय घेतला.बेलापूर फायटर संघाने निर्धारित ६ षटकार ३६ धावा केल्या. विजयासाठी ३७ धावांचा आव्हान साई इलेव्हन संघाने पाचव्या षटकात चार गडी राखून पूर्ण केले व स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विजेत्या संघाला ₹ ५०००/- व चषक डिझायर गॅलरीच्या वतीने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.उपांत फेरीच्या सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी करणारा चैतन्य शिंदे,कुणाल थोरात तसेच स्पर्धेमध्ये उत्कृष्ट यष्टीरक्षण करणारा जस्मित गुलाटी,उत्कृष्ट क्षेत्रक्षण करणारा ध्रुव मुथा, उत्कृष्ट गोलंदाजी करणारा पवन बच्छाव,उत्कृष्ट फलंदाजी करणारा युवराज पवार यांना मानचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post