श्रीरामपूर पंचायत समितीतील बेजबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करा ; राष्ट्रीय रिपब्लिकन'चे तालुकाध्यक्ष शिवाजी दांडगे यांची मागणी


राजेश बोरुडे, मो.9960509441
श्रीरामपूर : श्रीरामपूर पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचारी मर्जीप्रमाणे येतात व जातात. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेची कामे होत नाहीत. याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवाजी दांडगे यांनी केली आहे.

याबाबत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि, पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत, समाजकल्याण, लेखा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कृषी, पशुसंवर्धन, शिक्षण, आरोग्य, लघु पाटबंधारे, एकात्मिक बालविकास व सार्वजनिक बाधकाम असे विविध उपविभाग आहे.

या विभागातील कर्मचारी व अधिकारी यांना शासनाने सकाळी ९:४५ वा. संध्याकाळी ६:१५ वा. नियमित कामावर हजर राहणे असे आदेश दिलेले असताना अधिकारी व कर्मचारी ११ वाजेनंतर कामावर येतात व संध्याकाळी ५ वाजता शुकशुकाट झालेला दिसतो. काही अधिकारी जेवायला गेल्यानंतर परत येतील याची खात्री राहत नाही. जो तो आपल्या मर्जीप्रमाणे वागत आहे. पंचायत समितीला गटविकास अधिकारी आहे किंवा नाही. हा एक प्रश्न आहे. अशा बेजबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी दांडगे यांनी केली.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post