श्रीरामपूर : श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस कमिटी व श्रीरामपूर शहर काँग्रेसच्या माध्यमातुन माजी महसूल मंत्री आ.बाळासाहेब थोरात, आ.डॉ.सुधीर तांबे, जिल्हा बँकेचे संचालक, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांचे नेतृत्वाखाली श्रीरामपूरहून आज सकाळी ९ वाजता काँग्रेसचे कार्यकर्ते 'भारत जोडो' यात्रेत सहभागी होण्यासाठी रवाना झाले.
अखंड भारताच्या एकतेची संकल्पना घेऊन देशाचे व काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत ऐतिहासिक 'भारत जोडो' यात्रा उदंड प्रतिसादात सुरू असून, श्रीरामपूरचे कार्यकर्ते बाळापूर अकोला येथून 'भारत जोडो' यात्रेत सहभागी होणार आहेत. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा अभूतपूर्व व ऐतिहासिक ठरत असून महाराष्ट्रातील जनसामान्यांचा उदंड प्रतिसाद या यात्रेला मिळत आहे.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक ,मा उपनगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब दिघे,भारत भवार, सरवर अली मास्टर, अशोक जगधने, बाबा वायदंडे, संजय गोसावी, रामभाऊ तुपे, सुधीर भापकर, सुनील साबळे, गणेश काते, रफिक बागवान, अनिल लबडे, अनिल पटारे, सनी मंडलिक, रितेश चव्हाणके , कुणाल पाटील, गोपाल भोसले, विशाल साळवे, वैभव कुऱ्हे, कृष्णा पुंड, प्रताप गुजर, रफिक शेख, रितेश गिरमे, हेमंत टिळेकर, योगेश उंडे, विशाल दुपाटी, सोमनाथ दुशिंग, निलेश दळवी, श्रेयस रोटे, प्रशांत आल्हाट, शुभम गुजर, तीर्थराज नवले, गौरव राठोड, आकाश गुजर, सुमित मुसमाडे, आप्पासाहेब अभंग, सागर मगर आदी मान्यवर उपस्थित होते.