कृषी विभागाच्या अनुसूचित जाती व अनूसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन


सातारा दि. 3 : कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती व अनूसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी दि.15 नोव्हेंबर 2022 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी केले आहे.

 कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना या योजनांसाठी शासनाच्या Maha-DBT-https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत. यामध्ये उत्पादीत मालाच्या साठवणुकीसाठी पुर्वशितकरण गृह उभारणी, प्राथमिक, फिरते प्रक्रिया केंद्र, शितगृह, शितवाहन, फलोत्पादन यांत्रिकीकरण ट्रॅक्टर, पॉवर टिलर, औजारे, पिक संरक्षण औजारे, सामुहिक तलाव योजना, हरीतगृह उभारणी, शेडनेट हाऊस, मल्चींग कांदा चाळ उभारणी, आले व हळद पिक लागवड, ड्रॅगनफ्रुट, ब्ल्यू बेरी, अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका, लहान रोप वाटीका इत्यादी बाबींचा लाभ देण्यात येतो. 


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post