यावेळी शाळेचे प्राचार्य डॉ योगेश पुंड, क्रिकेटपटू सिध्दार्थ भगत,ज्येष्ठ शिक्षक हेमंत सोलंकी, विठ्ठलराव दांगट, दौलतराव पवार,अतुल जाधव, ऋषीकेश नवले,आकाश शिरसाठ,अमोल शिरोळे, संगणक शिक्षिका प्रतीक्षा भांड, स्पर्धा आयोजक गौरव डेंगळे, नितीन गायधने, नितीन बलराज आदी मान्यवर उपस्थित होते.
२ दिवस चालणारे या स्पर्धेत श्रीरामपूर तालुक्यातील विविध शाळेतील खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेत एकूण २४ सामने खेळवण्यात येणार असून विजेत्या संघाला ५ हजार व चषक डिझायनर गॅलरी श्रीरामपूर यांच्यावतीने प्रदान करण्यात येईल. प्रत्येक सामनावीराला प्रशांत भंडारी क्लासेस यांच्या वतीने मानचिन्ह प्रदान करण्यात येईल तसेच वैयक्तिक पारितोषिकमध्ये मालिकावीरासाठी देवासेठ चोरडिया यांच्याकडून बॅट तर प्रशांत माळवे यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज व उत्कृष्ट गोलंदाजांसाठी टी-शर्ट प्रदान करण्यात येईल.