खरीप हंगाम ऑक्टोबर 2022 मध्ये जिल्ह्यत सततच्या पावसामुळे खरिपातील सोयाबीन, कापूस, भुईमूग आदी पिकांना यलो मोझॅक नावाच्या विषाणूचा प्रार्दुरभाव झाला. अश्या परिस्थितीत काढणीला आलेल्या आलेल्या खरीप पिकांना परतीच्या पावसामुळे नुकसान होत आहे. सोगनी झालेल्या पिकात पावसाचे पाणी साचलेमुळेही नुकसान झाले आहे. महसूलच्या इ पिक पेरा नोंदीतील अडचणी मुळे शेतकऱ्यांना नोंदी करता आलेल्या नाही. त्यामध्ये प्रामुख्यने सरोवर डाऊन आसने, व्हर्जन एक नंतर व्हर्जन टू ऍप माहीत नसणे अश्या अनेक अडचणीमुळे इ पिक पेरा पन्नास टक्के रखडला. वास्तविक शासनाच्या महसूल, ग्रामविकास व कृषिविभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन कार्यशाळा घेणे गरजेचे होते व आजही आहे. तरी राहिलेल्या पिकाच्या नोंदी घेऊन नुकसानीचे पंचनामे करावे.
राज्यातील अस्तित्वात असलेले सरकार व विरोधी पक्ष शेतकऱ्याच्या प्रति अक्रियाशील व असंवेदनशील असलेचे दिसून आले. मागील केलेल्या दोन्हही कर्जमाफी योजनामध्ये शेतकऱ्याची फसवणूक झालेली दिसून आली. सरकार व विरोधक शेतकरी समस्या जाणून घेणेसाठी शेतकऱ्याचे मेळावे घेण्याऐवजी मुबईत दसरा मेळावे घेणेत धन्यता मानत आहे. कोरोनाचे संकट टळून दोन वर्ष होत आली परंतु ग्रामिण बस सेवा पूर्ववत केली नाही त्यामुळे ग्रामीण मुला -मुलींना महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवासाच्या प्रचंड अडचणी निर्माण होत असताना मंत्रीच जर शेकडो बसेस बुक करून ग्रामिण दळण वळण विस्कळीत करून 'एक दिवसाने काय फरक पडतो ' अशी बेजबाबदार विधाने करतात. मंत्री प्रश्न सोडविण्याऐवजी प्रश्न निर्माण करतात तर सामान्यांनी काय करावे.
तरी शासनाने खरिपाच्या नुकसानी पोटी हेक्टरी एक लाख रु. मदत दीपावली पूर्वी दयावी तसेच ग्रामिण भागातील बस सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली.