1874 मध्ये युनिव्हर्सल पोस्टल युनियनची स्थापना झाल्याच्या वर्धापन दिनानिमित्त, टपाल विभाग दरवर्षी राष्ट्रीय टपाल सप्ताह साजरा करतो, ज्याची सुरुवात जागतिक टपाल दिवस -9 ऑक्टोबर पासून होतेया वर्षीच्या जागतिक टपाल दिवसाची थीम ‘पोस्ट फॉर द प्लॅनेट’ आहे. भारतीय टपाल विभागात 1,55,000 पेक्षा जास्त टपाल कार्यालय असून या कार्यालयाच्या विस्तीर्ण अशा नेटवर्कद्वारे स्पीड पोस्ट, बिझनेस पोस्ट, ई-पोस्ट, आधार अपडेट आणि नावनोंदणी, पोस्ट ऑफिस पासपोर्ट यांसारख्या अतिरिक्त प्रीमियम सेवांसह अनोंदणीकृत मेल, नोंदणीकृत मेल, पत्रे, पार्सल, बचत बँक, पोस्टल लाइफ इन्शुरन्स/ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स या पारंपारिक सेवा प्रदान केल्या जातात.
या राष्ट्रीय टपाल सप्ताहाचा प्रारंभ 9 ऑक्टोबर–रविवार रोजी जागतिक पोस्ट दिवसाने होणार असून यानिमित्त सर्व पोस्ट ऑफिसमध्ये राष्ट्रीय टपाल सप्ताह 2022 चे बॅनर प्रदर्शित होईल. 10 ऑक्टोबर रोजी वित्तीय सशक्तिकरण दिवसानिमित्त पोस्ट ऑफिस बचत बँक खाती / इंडिया पोस्ट पेमेंट बँक खाती उघडण्यासाठी आणि पोस्टल लाइफ इन्शुरन्स/ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स पॉलिसींच्या खरेदीसाठी मोहिमा आयोजित केल्या जातील. 11 ऑक्टोबर रोजी टपाल टीकीट संग्रह (फिलाटली) दिवसाप्रसंगी शालेय मुलांसाठी एक छंद म्हणून फिलाटलीबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी विभाग फिलाटेलिक क्विझ स्पर्धा, फिलाटेलिक सेमिनार आणि कार्यशाळा आयोजित केल्या जातील. गडचिरोली भंडारा सारख्या जिल्ह्यात चंदूपत्ता, महुवा, हिरडा यासारख्या लघु वनोपज यावर तसेच बुलढाण्याच्या जगप्रसिद्ध लोणार सरोवर यावर टपाल तिकीट तयार करण्याच्या संचाचे सुद्धा अनावरण करण्यात येईल अशी माहिती शोभा मधाळे यांनी यांनी यावेळी दिली. ऑक्टोबर रोजी मेल आणि पार्सल दिवस असून यादिनी ग्राहकांसाठी ग्राहक मेळाव्याचे आयोजन विभागीय स्तरावर केले जाईल. या सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी 13 ऑक्टोबर रोजी अंत्योदय दिवस असून याअंतर्गतआधार नोंदणी आणि अद्ययावतीकरण शिबिरे ग्रामीण/दुर्गम भागात आणि शहरी झोपडपट्ट्यांमध्ये आयोजित केली जातील. लोकांना ‘थेट लाभ हस्तांतरण’, सामाजिक सुरक्षा पेन्शन, जन सुरक्षा योजना, सुकन्या समृद्धी खाती यांच्या उपलब्धतेबद्दल जागरूक केले जाईल.