श्रीरामपूर : येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे सोमवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी दुपारी २:३० वा तिसरी श्रीरामपूर रोलबॉल लीग स्पर्धेसाठीची निवड चाचणी आयोजित होणार असल्याची माहिती रोल बॉलचे प्रशिक्षक श्री नितीन गायधने यांनी दिली.
ग्रामीण भागात रोलबॉल या खेळाचा प्रचार-प्रसार, व तळागाळातील विद्यार्थ्यांना हा नवीन खेळ अवगत व्हावा, यासाठी ही रोलबॉल लीग आयोजित करण्यात आली आहे. निवड झालेल्या खेळाडूंची ८ संघांमध्ये विभाजन करण्यात येणार आहे.
निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे प्राचार्य डॉ योगेश पुंड , श्रीराम अकॅडमीच्या प्राचार्या सौ जयश्री पोडघन,श्री गोकुळ खंडागळे,श्री नितीन बलराज आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. निवड चाचणीसाठी येणाऱ्या खेळाडूंनी श्री नितीन गायधने,श्री नितीन बलराज,श्री दौलत पवार आदीशी संपर्क साधून सहभागी व्हावं.