सह्याद्री स्केतर्स व ब्रह्मगिरी स्केतर्सला संघाला श्रीरामपूर रोलबॉल लीग स्पर्धेचे विजेतेपद, धनेश चित्ते स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू


श्रीरामपूर (प्रतिनिधी ) : येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मैदानावर अहमदनगर जिल्हा रोलबॉल संघटनेच्या मान्यतेने तिसरी रोलबॉल लीग उत्साहात संपन्न झाली. या लीग स्पर्धेमध्ये मोठ्या गटातील मुलांच्या झालेल्या अंतिम सामन्यात सह्याद्री स्केतर्स संघाने गिरनार स्केतर्स संघाचा ३-१ ने पराभव केला. छोट्या गटातील मुलांच्या अंतिम सामन्यात निलगिरी स्केतर्स संघाने विंध्याचल स्केतर्स संघावर २-० ने विजय मिळवला तर मुलींच्या अंतीम सामन्यात ब्रह्मगिरी स्केतर्स संघाने सह्याद्री स्केतर्स वर   ३-२ ने विजय मिळवला.

सह्याद्री स्केतर्स,निलगिरी स्केतर्स व ब्रह्मगिरी स्केतर्स संघानी श्रीरामपूर रोलबॉल लीग स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. स्पर्धेचे बक्षीस वितरण एज्युकेशन सोसायटीचे सचिव जन्मजय टेकावडे,पत्रकार करण नवले,दिपाली चित्ते, पत्रकार स्वामिराज कुलथे,राजदिपसिंह जाधव,शुभम पवार,सोहेल शेख, लखन राऊत,पत्रकार प्रवीण जमदाडे, प्रियांका यादव,शाळेचे प्राचार्य डॉ योगेश पुंड,हेमंत सोलंकी, स्पर्धा आयोजक नितीन गायधने,गौरव डेंगळे तसेच बहुसंख्येने मान्यवर उपस्थित पार पडले. यावेळी स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू तन्मय गिरमे, ईशान्य भोसले धनेश चित्ते जस्मित गुलाटी सोहम दौंड, केविष जैन,शुभम डावखर,वैष्णवी शेळके,धनश्री चौधरी,प्रथमेश दहातोंडे,सार्थक रसाळ,शिवराज पवार हरशीन धूपर,कार्तिक घुगे आधी खेळाडूंचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.या स्पर्धेतील उत्कृष्ट युवा खेळाडू म्हणून पवित्रा चोथानी, प्रथमेश जैत, सावरी खटाणे व रक्षा साहनी या खेळाडूंचा मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. विजेत्या संघांना विजेता चषक प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post