श्रीरामपूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ एकनिष्ठ शिवसैनिक यांचे सभासद नोंदणी श्रीरामपूर शहर व तालुक्यात मोठ्या उत्साहात करण्यात आली. फक्त निष्ठावान शिवसैनिकांचे सभासद नोंदणीचे फॉर्म यावेळी भरून घेण्यात आले असून, मागील सात दिवसात पाच हजार सभासद नोंदणीचा टप्पा यावेळी पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती शिवसेना शहर प्रमुख सचिन बडदे यांनी दिली. अनेक गद्दारांनी स्वतःच्या स्वार्थासाठी शिवसेना सोडली. परंतु, निष्ठावान शिवसैनिक अजूनही त्याच ठिकाणी आहे. याउलट शिवसेनेत लोकांचे येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याचाच प्रत्यय या सभासद नोंदणीच्या वेळी आला, असेही बडदे यांनी सांगितले.
हे सभासद नोंदणीचे फॉर्म शिवसेना शहर प्रमुख सचिन बडदे, तालुकाप्रमुख दादासाहेब कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आले. यावेळेस पूर्ण झालेले सभासद नोंदणीचे फॉर्म शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्रजी झावरे यांच्याकडे शिवसेना संपर्क कार्यालय या ठिकाणी देण्यात आले. हे फॉर्म लवकरात लवकर मातोश्री या ठिकाणी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याकडे पोहोचवण्यात येतील, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्रजी झावरे यांनी दिली.
यावेळेस शिवसेनेचे नेते माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन बडदे, वाहतूक सेनेचे शहर संघटक यासीन सय्यद ,युवा सेना शहर प्रमुख निखिल पवार, शिवसेना उपतालुकाप्रमुख विजू बडाख, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख इरफान शेख यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.