शहरात विमा कर्मचार्‍यांची निदर्शने


संगमनेर ( प्रतिनिधी ) संगमनेर जनरल इन्शुरन्स एम्पलॉइज असोसिएशन व सार्वजनिक क्षेत्रातील साधारण विमा कंपन्या कार्यरत जॉईंट फोरम ऑफ ट्रेड युनियनच्या निर्देशानुसार देशभर साधारण विमा कर्मचाऱ्यांनी भोजन अवकाश दरम्यान निदर्शने केली. साधारण विमा कर्मचाऱ्यांना एलआयसी प्रमाणे वेतनवाढ देण्यात यावी एनपीएस मध्ये प्रबंधात तर्फे 14% अंशदान द्यावे फॅमिली पेन्शन मध्ये वाढ करण्यात यावी या मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली.
 यापूर्वी 4 ऑगस्ट रोजी जीप्साने 12 टक्के वेतनवाढ देण्याचा प्रस्ताव दिला सर्व संघटनांनी एलआयसी प्रमाणे वेतनवाढ देण्यात यावी ही मागणी केली तसेच विश्वासात न घेता पुनर्रचनेच्या नावाखाली अनेक कार्यालय बंद व विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे संगमनेर येथे संघटनेचे सचिव कॉम्रेड सुभाष कु-हे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉम्रेड नामदेव कोंडार,कॉम्रेड बाळासाहेब घुगे, कॉम्रेड किसन गोंदके, कॉम्रेड रामनाथ जोंधळे, कॉम्रेड तुषार कुलकर्णी यांनी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी केली व सहभाग नोंदवला.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post