दिव्यांगांसाठी २८ सप्टेंबरला श्रीरामपुरात भव्य शिबीर


श्रीरामपूर : अपंग सामाजिक कल्याण व पुनर्वसन संस्था संचलित आधार दिव्यांग संघटना यांच्या वतीने बुधवार, दि. २८/०९/२०२२ रोजी सकाळी ११ ते ०२ या वेळेत प्रियदर्शनी मंगल कार्यालय, बाजार तळ, श्रीरामपूर येथे दिव्यांगांसाठी भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष लक्ष्मण गोरखनाथ खडके यांनी दिली.

या शिबिरामध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत दिव्यांगांना दरमहा ३५ किलो अन्नधान्य २ रू. प्रतिकिलो दराने गहू व ३  रू. प्रतिकिलो दराने तांदूळ मिळण्यासाठी त्यांच्या कुटुंबाचा अंत्योदय अन्न धान्य योजनेत समावेश होण्यासाठी अपंग सामाजिक कल्याण व पुनर्वसन संस्था श्रीरामपूर संचालित आधार दिव्यांग संघटनेच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून शासन दरबारी पाठपुरावा सुरु आहे. त्याचीच फलश्रुती म्हणून शिबिरामध्ये दरमहा ३५ किलो अन्नधान्यासाठी  अंत्योदय योजनेचे फॉर्म भरून घेतले जाणार आहे. त्यासाठी दिव्यांगांनी शिबिरामध्ये सहभागी होऊन १) शिधापत्रिकेची छायांकित प्रत २) दिव्यांग प्रमाणपत्र ३) का. तलाठी यांचा ४४ हजारापर्यंतचा उत्पन्न दाखला ४) कुटुंबातील सर्वांचे आधार कार्ड ५) बँक पास बुक ६) गैस बुक ७) फोटो ८) का. तलाठी यांचा रहिवाशी दाखला ९) फोटो  सोबत घेऊन येण, असे आवाहन संघटनेच्या करण्यात आले.

शिबिरामध्ये रेल्वे पाससाठी लागणारे सरकारी डॉक्टर यांचे प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. रेल्वे पाससाठी लागणारे कागदपत्र जमा करून दिव्यांगांना रेल्वे पास मिळण्यासाठी रेल्वे विभागाशी संघटनेमार्फत पाठपुरावा केला जाणार आहे. त्यासाठी दिव्यांगांनी येताना १) दिव्यांग प्रमाणपत्र २) आधार कार्ड ३) फोटो यांच्या प्रत्येकी ३ प्रती सोबत आणाव्यात. यावेळी नगरपालिका निधी, ग्रामपंचायत निधी वितरणाबाबत विचार विनिमय करून पुढील रूपरेषा ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त दिव्यांगांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन संघटनेच्या वतीने संपर्क प्रमुख राम डमाळे, जिल्हा प्रभारी विष्णुपंत पाठक, तालुका प्रभारी भारत चौधरी, शहर प्रभारी सुमित रहिले, शहर महिला प्रमुख मुक्ताताई येवलेकर यांनी केले.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post