साईकिरण टाइम्स | समाजवादी पक्षाच्या आंदोलनाला यश ; सय्यदबाबा चौकातील रेल्वे भुयारी मार्ग रस्त्याचे कामे सुरु...!नागरीकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करुन नगर पालिकेस सहकार्य करावे; जोएफ जमादार


श्रीरामपूर : सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शहरातील रस्त्यांवर कमालीचे खड्डे पडले आहेत. या खड्डेरहित रस्त्यावर वाहन चालवताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. शिवाय सय्यदबाबा चौकातील रेल्वे भुयारी मार्ग या रस्त्यावर वाहन चालविणे तर सोडाच पादचाऱ्यांना पायी चालणे देखील मोठे मुश्किल झाले होते. अशात या खड्ड्यांमुळे अनेक वाहनांचे छोटे-मोठे अपघात होणे हे नित्याचेच होऊन बसले होते. याबाबत समाजवादी पार्टीचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी श्रीरामपूर नगरपालिका प्रशासनास संबंधित बाबी अनेकवेळा कळवूनही नगर पालिका प्रशासन कुठलीच दखल घेत नव्हते. नगर पालिकेकडे जर सदरील कामांसाठी निधी उपलब्ध नसेल तर समाजवादी पार्टी भिक मांगो आंदोलनाद्वारे श्रीरामपूर न.पा.ला निधी उपलब्ध करुन देईल या अनुषंगाने जोएफ जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली समाजवादी पक्षाने भिक मांगो आंदोलन करत जनसामान्यांसोबत आपली नाराजगी दर्शविली होती.

या आंदोलनात आसिफ तांबोळी, अय्यूब पठाण,इमरान शेख, रिजवान बागवान, ज़केरिया सैय्यद,अरबाज़ क़ुरैशी,रवी बोरसे, कलीम वेल्डर,अब्दुल सैय्यद, मतीन शेख, राजू शेख, साद पठाण, मुबस्शिर पठाण, गुड्डु जमादार आदींनी आपला सहभाग नोंदवला होता.

या आंदोलनाची येथील उप विभागीय (प्रांत) अधिकारी तथा श्रीरामपूर नगर पालिकेचे कर्तव्यदक्ष प्रशासक मा.श्री. अनिल पवार साहेब आणि मुख्याधिकारी मा.श्री.गणेश शिंदे साहेब यांनी दखल घेत सदरील सय्यदबाबा चौकातील रेल्वे भुयारी मार्ग रस्त्याची कामे चालु केल्याने शहरातील नागरीकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेवटी उशीरा का होईना मात्र नगर पालिका प्रशासनाने समाजवादी पार्टीच्या आंदोलनाची दखल घेत सदरील कामे चालु केले असल्याने समाजवादी पार्टी तर्फे श्रीरामपूर नगर पालिका प्रशासनाचे अभार व्यक्त करण्यात येत आहे.

मात्र सदरील विकास कामांनिमित्त काही दिवस सदरील मार्ग हा रहदारीकरीता बंद राहणार आहे म्हणून तृर्त पर्यायी मार्ग म्हणून वॉर्ड क्र.१ मधील सिद्धार्थनगर (मुस्लिम कब्रस्तान जवळील) ते भारत गॅस कंपनी दरम्यानच्या रेल्वे भुयारी मार्गचा वापर करुन नगर पालिका प्रशासनास सहकार्य करावे असेही श्री.जमादार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post