श्री शक्ती ग्रुप श्रीरामपूर व जिल्हा बँक अहमदनगर ,शहर काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सातव्या टप्प्यातील १७ जे. एल. जी, महिला बचत गटांना १७ लक्ष रुपये कर्ज वितरण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. सर्वसामान्य महिलांना व्यवसायासाठी बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करून, त्यांच्या पाठीशी सदैव उभे राहणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. आतापर्यंत ९६ बचत गटांना ९६ लक्ष रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आलेले असून भविष्यातही हे समाजकार्य चालूच ठेवणार असल्याचे करण ससाणे यांनी म्हटले आहे. यानंतर काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे म्हणाले , स्वर्गीय ससाणे साहेबांच्या समाजकार्याचा वसा करण व दिपाली या उभयतांनी समर्थपणे चालवलेला असून, बचत गटाच्या मदतीने महिलांनी छोटे छोटे व्यवसाय उभारून स्वतःच्या पायावर उभे राहावे. यानंतर महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेसच्या सरचिटणीस सौ. दिपालीताई ससाणे म्हणाल्या स्व. जयंतराव ससाणे यांचे महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचे स्वप्न स्त्री शक्ती या संस्थेच्या माध्यमातुन पूर्ण करत असून, त्यास राजश्रीताई आणि पती करण ससाणे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे.
याप्रसंगी जि.प. चे माजी सभापती बाबासाहेब दिघे, मा नगरसेवक आशिष धनवटे, श्याम आडांगळे, सुभाष तोरणे, प्रवीण नवले, राहुल बागुल, सरबजीत सिंग चूग,प्रसाद चौधरी, संतोष परदेशी, रितेश एडके, सनी मंडलिक, जावेद शेख, सुरेश ठुबे,वैभव पंडित, रियाज खान पठाण, युनुस पटेल, लक्ष्मण शिंदे, संजय साबळे, बाळसिंग टाक, जमील शेख, राजेश जोंधळे, गणेश काते, भागचंद धुळगंड, नजीर टेम्पोवाले, अमोल चिंतामणी, जिल्हा बँकेचे तालुका विकास अधिकारी पवार साहेब, कार्यालय प्रमुख खर्डे साहेब, शाखा अधिकारी अशोक पटारे, अशोक साळवे, चव्हाण मॅडम व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन अजय धाकतोडे यांनी केले.