ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली, स्वागतनृत्य , आदिवासी नृत्य, शेतकरी नृत्य- भारतीय संस्कृती व लोककलांचे दर्शन घडवणारी नृत्ये पारंपारिक वेशभुषेत सादर करण्यात आली. मा. मुख्याध्यापिका सि. ज्योति यांनी अहवालवाचन केले. कोरोना काळात ऑनलाइन व पालकांच्या सम्मतीने ऑफलाइन शाळा चालू होती. विविध स्पर्धा झाल्या. कार्यक्रमात नाट्यछटा, इंग्रजी गाणी, कोरोना महामारीमुळे शिक्षणाची झालेली दुरावस्था व उपाय यावर आधारित पथनाट्य सादर करण्यात आले. माध्यमिक शालांत परीक्षा 2021-2022, यशस्वी विद्यार्थिनींना पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. शाळेतील माजी विद्यार्थिनी 1997 ची बॅच यांनी एकत्र येत शाळेतील गरजू मुलींसाठी रुपये 13000/- देणगी देवून शाळेप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली, त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
ध्येय ठरवा, ध्येयाच्या परिपूर्तीसाठी अभ्यास करा, अडचणीना घाबरू नका, तर धैर्याने पुढील आव्हानांना सामोरे जात यश मिळवा असा संदेश मान्यवरांनी मुलींना दिला. याप्रसंगी संत लुक्स हॉस्पिटलच्या धर्मभगिनी, हरेगांव धर्मग्रामाचे धर्मगुरू, परिसरातील शाळांचे मुख्याध्यापक, माजी शिक्षक यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मा. मुख्याध्यापिका सिस्टर. ज्योती गजभिव यांच्या मार्गदर्शनाखाली येशू हृदय संस्थेच्या धर्मभगिनी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. या स्नेहसम्मेलनाचे सूत्रसंचालन श्री. अतुल राठोड सरांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार श्री. सुहास ब्राम्हणे सरांनी मानले. शालेय गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.