कोपरगाव : कोकमठाण (ता. कोपरगांव) येथे सुरु असलेल्या योगीराज सद्गुरू गंगागीरीजी महाराज सप्ताहास लोकनेते स्व. जयंतराव ससाणे मित्र मंडळ व श्रीरामपूर शहर काँग्रेस कमिटी यांच्या वतीने संत श्री रामगिरीजी महाराज यांची भेट घेत त्यांचा सन्मान केला. तसेच कमिटीच्या वतीने सप्ताहासाठी ३१,८०० रुपयांची देणगी देण्यात आली.
यावेळी करण ससाणे म्हणाले की, सरला बेट हे आज लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. संत गंगागिरी महाराज यांचे कार्य पुढे महंत गुरुवर्य रामगिरी महाराज यांनी अविरतपणे सुरु ठेवले आहे. वारकरी संप्रदायाची पताका कायम तेवत ठेवण्याचे तसेच धार्मिक व सामाजिक प्रबोधनाचे कार्य या सप्ताहच्या माध्यमातून सुरु आहे. ही अतिशय महत्वपूर्ण बाब असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी मा. उपनगराध्यक्ष, जिल्हा बँक व नामको बँकेचे संचालक करण ससाणे, साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, जि. प. चे माजी सभापती बाबासाहेब दिघे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सुधीर नवले, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे, मा.नगरसेवक रितेश रोटे, आशिष धनवटे उपस्थित होते