श्रीरामपूर : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध उपक्रम रावबिले जाणार आहेत. शालेय विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तकांचे वाटप, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान-सत्कार, भव्य रथयात्रा, अभिवादन सभा, अन्नदानाचा कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन संघटनेच्यावतीने करण्यात येणार असून, मोठ्या उत्साहात भीम जयंती साजरी करणार असल्याचे माध्यमांशी बोलताना पठाण यांनी सांगितले.
यासंदर्भात गुरुवारी ( दि.१७ ) शासकीय विश्रामगृहामध्ये भिम गर्जना संघटनेची बैठक संपन्न झाली. त्यावेळी उपस्थित संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज भाई पठाण, महाराष्ट्र प्रमुख शिवा साठे, संघटक अशोकरावजी गुडेकर, बाळासाहेब गुडेकर, जिल्हा कार्याध्यक्ष मोसिन शेख, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अकबर शेख, सचिन बनकर, युवाध्यक्ष अतिक शेख, सुनील भाऊ थोरात, गणेश महांकाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.