सफाई कामगारांचे थकीत वेतन ८ दिवसात मिळणार


साईकिरण टाइम्स | ११ फेब्रुवारी २०२१

श्रीरामपूर | श्रीरामपूर नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी, वाहनचालक, सुपवायझर यांचे थकीत वेतन मिळावे, अँवार्ड कामगारांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्न सोडवावा या व इतर अनेक मागण्यांसाठी नगरसेविका प्रणिती चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस सफाई कामगार सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष दीपक चव्हाण यांनी मंगळवारी (दि.९) नागरपालिकेसमोर उपोषण केले होते. दरम्यान, मुख्याधिकारी यांनी लेखी पत्र दिल्यानंतर सायंकाळी उपोषण सोडण्यात आले. घनकचरा कामगारांचे थकीत वेतन ८ दिवसात करणार असल्याचे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिले असल्याचे दीपक चव्हाण यांनी सांगितले.

            घनकचरा, सेवानिवृत्त व सफाई कामगार यांच्या प्रलंबित प्रश्नावर नगरसेविका प्रणिती चव्हाण व कामगार नेते दीपक चव्हाण यांनी मंगळवारी आमरण उपोषण केले होते. नगर परिषदेचे सर्व विभागातील अधिकारी, सेवानिवृत्त कर्मचारी आणि कामगार यांचे नगरपरिषदतर्फे पेन्शन विक्री, पदोन्नति फरक, सेवानिवृत्त ६ व्या आणि ७ व्या वेतन आयोगचा फरक, देय रक्कमा, थकीत वेतन, ई पोटी देय थकीत रक्कम रूपये ६ कोटी ८२ लाख रूपये असुन त्याचबरोबर माहे. सप्टेंबर ते माहे. जानेवारी पर्यंतचा घनकचरा कामगार यांचे थकीत वेतन रूपये 75 लक्ष रूपये आहे. याबरोबरच अॅवार्ड च्या कामगारांना गत् दोन दशकाहुन जास्त न्यायालयीन लढा नगर परिषदेचे विरुध्द चालु असुन कामगारांच्या मुलांना ऊपासमारीची वेळ आली आहे. या सर्व प्रश्नांना नगर परिषद तर्फे मुख्याधिकारी गणेशजी शिंदे यांनी सकारात्मक भुमिका घेवुन कामगार प्रश्नावर सहानुभूती पुर्वक निर्णय घेतला असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. घनकचरा थकीत वेतन ८ दिवसात करण्याचे मान्य केले. कामगारांच्या मागणीनूसार अॅवार्डच्या बाबतीत संबंधित वकील यांच्याशी चर्चा करून सोडवण्यात येतील. तसेच गोंधवणी रोड येथील प्रभाग क्रमांक दोन मधील ६३ कामगार सदनिका २००९ मध्ये कामगारांच्या नावे करण्यात आल्या असुन या सदनिका रमाई आवास योजनेअंतर्गत बांधकाम परवानगी, मेडिकल बिल, आणि ऊर्वरित कर्मचारी यांना शासकीय सदनिका देणेबाबत येत्या सर्व साधारण सभेत  विषय पत्रिकेत घेण्यात येतील असे लेखी स्वरुपात मुख्याधिकारी यांनी दिले. शासकीय गणवेश, बॅक ऑफ महाराष्ट्र मध्ये कामगारांच्या बाबतीत होणारी वेतन खात्यावर जमा करणे बाबतीत होणारी दिरंगाईबाबत लेखी पत्र व्यवस्थापक यांना देण्यात आले असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.  मुख्याधिकारी यांनी नगरसेविका सौ प्रणिती दीपक चव्हाण व दिपक चरणदादा चव्हाण यांना लेखी पत्र देवुन उपोषण सोडवले. भविष्यात कामगार यांना उपोषण करण्याची गरज पडणार नाही. अशा स्वरूपाचे कामकाज होईल. मात्र, कामगार यांनीही येथुन पुढेही प्रशासणास सहकार्य करावे,अशी सुचना केली.

           या उपोषणाला आमदार लहु कानडे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, माजी नगराध्यक्ष श्री अनिल कांबळे ,नगरसेवक अंजूमभाई शेख, श्रीनिवास बिहाणी, राजेश अलघ, मुज्जफर शेख, दिलीप  नागरे, दीपक बाळासाहेब चव्हाण, ताराचंद रणदिवे, मनोज लबडे, श्यामलींग शिंदे, कलीमभाई कुरेशी श्री रीतेश रोटे, नगरसेविका सौ समिना शेख सौ भारती कांबळे, जयश्री शेळके, सचिन गुजर, संजय छल्लारे , मुन्ना पठाण, ईम्रानभाई शेख, मल्लू शिंदे ,कामगार नेते श्री नागेशजी सावंत,शेतकरी संघटनाचे अहमदभाई जहांगीरदार, विश्वनाथ बोकफोडे , रियाज  पठाण, आपचे तिलक डुंगरवाल, भारतीय लहुजी सेनेचे श्बाळासाहेब बागुल , रज्जाक शेख, हणीफ पठाण, श्रीतेश एडके, दत्तात्रय कांदे, गोविंद ढाकणे, विनोद वाघमारे, आदी संघटनेचे मान्यवर उपस्थित होते. नगर परिषद विभागातील अधिकारी, घनकचरा कामगार, सेवानिवृत्त कर्मचारी महिला उपस्थित होते.

            उपोषणस्थळी दिवसभर कामगार वर्गापैकी महिला भगिनीं मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यामध्ये श्रीमती पार्वती दाभाडे, श्रीमती सुमन करोसिया, सौ माया जेधे, ताराबाई झिंगारे, पुष्पलता चव्हाण, माया रील, नर्मदा झिंगारे आणि श्रीरामपूर नगर परिषद पतसंस्था चेअरमन प्रकाश सपकाळ, मुन्ना जेधे, रमेश बिंगळे, राजु बिडलान, मनोज झिंगारे,  सचिन चंडाले,राजु कंडारे, रवि गोयर, भाऊसाहेब शेळके, संजय बागडे, राजेंद बोरकर, अमर दाभाडे, अमरावती,अजय जनवेजा, किसन गायके, संतोष केदारे, दिपक धनसिग, लाखन दाभाडे, सुनील जाधव,किसण चव्हाण, मनोज चव्हाण, छगन रील,  श्रीपाद बिल्दीकर, बाबुराव मगर, नरेश सांगळे, गुळाब पवार, विजय सोळंकी, प्रविण बागडे, प्रदीप बागडे, प्रसाद चव्हाण, उमेश झिंगारे आदी कर्मचारी उपस्थित होते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post