साईकिरण टाइम्स | १३ डिसेंबर २०२०
श्रीरामपूर | आंनदश्री फौंडेशन व आयटी ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने दिल्या जाणाऱ्या "महात्मा गांधी दर्शन अवॉर्ड २०२० "ने डॉ. दत्ता विघावे यांना सन्मानित करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम मुंबई स्थित कल्याण येथील हॉटेल सागर इंटर नॅशनल येथे मोठया थाटात पार पडला.
क्रिकेटच्या माध्यमातून नावलौकिक मिळविणारे डॉ. दत्ता विघावे यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्यही स्पृहणीय असून वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन ( डब्ल्यूसीपीएच्या ) माध्यमातून त्यांनी देशभरात आपले कार्य पसरविले आहे. एडसग्रस्त, कुष्टरोगी, अनाथ मुले, छोटया मुले व मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारा संदर्भातही त्यांनी विशेष मोहिमा राबविल्या आहेत.
सन २०२० मध्ये संपूर्ण जगभर कोरोना व्हायरस ( कोविड-१९ ) ने हाहाकार माजविला असताना डॉ. विघावे यांनी अनेक प्रकारच्या सामाजिक माध्यमांतून समाज प्रबोधनाचे कार्य केले असून कोविड -१९ पिडीतांना मदत करणाऱ्या देशभरातील अकरा हजारापेक्षा जास्त कोरोना योद्ध्यांना " ऑनलाईन पध्दतीने वर्ल्ड पार्लमेंट कोरोना वॉरियर्स अवॉर्ड " देऊन गौरविले आहे. तसेच कोरोना संक्रमणाच्या काळात जीवाची बाजी लावून कार्य करणाऱ्या डॉक्टर्स, सिस्टर्स, नर्सेस, आरोग्य सेवक /सेविका, पोलिस, पत्रकार, समाजसेवक, शासकीय कर्मचारी -अधिकारी व देशसेवक यांचाही समक्ष " वर्ल्ड पार्लमेंट कोरोना वॉरियर्स अवॉर्ड " देऊन सन्मान केला व त्यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांच्यात पुढील कार्य करण्यास जोश भरला.
समाजाप्रती निस्वार्थ कार्य करणाऱ्या डॉ. दत्ता विघावे यांच्या सदर कार्याची दखल घेवून आनंदश्री फौंडेशन व आयटी ट्रस्ट मुंबई यांनी " महात्मा गांधी दर्शन अवॉर्ड -२०२० " देऊन सन्मान केल्याबद्दल डॉ. दत्ता विघावे यांचे समाजाच्या विविध स्तरातून कौतुक होत आहे.