विनापरवाना बांधकामावर महसूल प्रशासन करणार कारवाई


साईकिरण टाइम्स | १० डिसेंबर २०२०

बेलापुर (प्रतिनिधी) शेती क्षेत्रात परवाना न घेता बांधकाम करणाऱ्यांवर लवकरच कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. बेलापूर शहरालगत असलेल्या श्रीरामपूर बेलापूर रस्त्यावर नुकतीच उपविभागीय अधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांनी पाहणी केल्यानंतर मंडलाधिकारी व कामगार तलाठी यांना तशा सुचना देण्यात आलेल्या आहेत.                                      अहमदनगर येथील बैठक आटोपुन परतत असताना उपविभागीय अधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांनी बेलापूर- श्रीरामपुर रस्त्यावर असणाऱ्या व्यवसायीकांची माहीती घेतली. त्याकरीता त्यांनी आपले सरकारी वाहन दुरच ठेवुन या सर्व भागाची पायीच पहाणी केली. त्यावेळी अनेक ठिकाणी बिन शेती न करता तसेच बांधकामाची परवानगी न घेता बांधकाम केल्याचे आढळून आले. त्यांनी तातडीने मंडलाधिकारी बाबासाहेब गोसावी व कामगार तलाठी कैलास खाडे यांना सुचना देवुन अशा प्रकारे बिन शेती नसलेल्या  व विना परवाना बांधकाम करणाऱ्या व्यवसायीकांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.  

विना परवानगी बिन शेती व अनाधिकृत बांधकाम  आसणार्या व्यवसायीकांचा शोध घेवुन दंडात्मक कार्यवाही करण्याच्या नोटीसा बजावण्यात येणार असल्याचे मंडलाधिकारी बाबासाहेब गोसावी  व कामगार तलाठी कैलास खाडे यांनी सांगीतले. महसुलच्या या कारवाईमुळे व्यवसायीकामध्ये खळबळ उडाली आहे. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post