साईकिरण टाइम्स | १५ डिसेंबर २०२०
युवा फौंडेशनचे रोनीत किशोर घोरपडे, ओम साई असोसिएटचे अभिषेक चंद्रकांत गुलदगड यांच्या पुढाकाराने दोन गटात पार पडलेल्या या स्पर्धेत मोठ्या गटात पियुष धस प्रथम, तन्वी बकाल द्वितीय तर अथर्व भालेराव हा तृतिय आला. तर मोठ्या गटात यशश्री कोठारी हिने प्रथम क्रमांक पटकाविला. समिक्षा येळवंडे व पुजा यादव या दोघींनी दुसरा तर गौरव थोरात याने तिसरा क्रमांक पटकाविला. रोख रक्कम, प्रमाणपत्र व स्मरणचिन्ह असे पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. परिक्षक म्हणून चित्रकार रवी भागवत यांनी काम पाहिले.
पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्रीरामपूरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधा आदिक होत्या. यावेळी उपस्थित नगरसेवक राजेंद्र पवार,राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष कैलास पाटील बोर्डे,शहराध्यक्ष लकी जी सेठी,युवक शहाराध्यक्ष योगेश जाधव,सामाजिक कार्यकर्ते अल्तमश पटेल,अर्जुन आदिक आदी आदींच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
नगराध्यक्षा आदिक यावेळी म्हणाल्या, कोराना काळानंतर प्रथमच शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम होत आहे. शिवाय त्यास भरभरून प्रतिसाद मिळाला ही आनंदाची बाब आहे. सहभागी विद्यार्थ्यांची चित्रे पाहून मन हरखून गेले. इतक्या कमी वयात मुली व मुलांमधील प्रतिभा पाहून विषेश समाधान वाटते. कोरोना, स्वच्छता, जागतीक शांती अशा जटिल विषयांवरही विद्याथ्र्यांनी अतिशय समर्पक चित्रे काढल्याचे त्या म्हणाल्या.
चित्रकार भागवत म्हणाले, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना याच वयात चालना मिळाल्यास त्यांच्यातील कलावंत आणखी मोठा होण्यास प्रारंभ होतो. सुंदरम युवा फाऊंडेशन व ओम साई असोसिएट्स यांनी या उपक्रमाद्वारे तालुका व शहरातील विद्यार्थ्यांच्या कलेला एकप्रकारे उभारी दिली आहे. यावेळी रोनित घोरपडे, अभिषेक गुलदगड यांची भाषणे झाली.
पवारांचे व्यंगचित्र
माजी केंद्रीयमंत्री शरदपवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी व्यंगचित्रकार रवी भागवत यांनी शरद पवार यांचे व्यंग़चित्र काही क्षणात साकारले. अगदी मोजक्या रेषांमधून त्यांनी पवारांचे व्यक्तीमत्व हुबेहुब चित्तारले. उपस्थित विद्यार्थी, पालक व मान्यवरांकडून त्यास भरभरून दाद मिळाली.