श्रीरामपूर-इ-निविदा प्रक्रियेत पंचायत समिती अधिकाऱ्यांपासून ग्रामसेवकांपर्यंत सर्वांकडूनच शासकीय गोपनियतेचा भंग झाला. खासगी संगणक चालकांकडे ई-निविदा भरण्यात आल्या. अखिल भारतीय छावा संघटनेने पंचायत समितीपासून आयुक्तालयापर्यंत निवेदने दिली, अनेकदा आंदोलने केली मात्र वरिष्ठ अधिकारी कारवाई करण्यास टाळाटाळ करतात. तेव्हा आपण जातीने या प्रकरणात लक्ष घालून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी छावाचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांच्यासह सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी ग्रामविकास राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांना दिलेल्या निवेदनात केली.
मंत्री सत्तार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ई -निविदा प्रकरणी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेने गेल्या 10 महिन्याच्या कालावधीत अनेक बाबी पुराव्यानिशी उघकिसआणून देखील ई- निविदा शासकीय कार्यालयात न होता खाजगी संगणक चलकाकडे प्रसिद्ध केल्या जातात या संदर्भात,खाजगी संगणक चालक ,त्यांना डी एस सी देऊन शासकीय गोपनीय निविदा प्रक्रिया ची कागदपत्रे पुरविणारे गटविकास अधिकारी /ग्रामविकास अधिकारी/ग्रामसेवक यानेचेवर फौजदारी कारवाई करावी या मागणीसाठी आम्ही वेळोवेळी उपोषणआंदोलन जिल्हा परिषद अहमदनगर याचे समोर करून केवळ चौकशीचे आदेश दिले जातात आणि जे दोषीआहेत तेच गटविकासअधिकारी चौकशीसाठी नेमतात हा सावळा गोंधळ मिटवून आपण या प्रकरणी लक्ष घालून स्वतः चे अधिकार वापरून ई-निविदा खाजगी ठिकाणी प्रसिद्ध करणाऱ्या गटविकासअधिकारी अन्य ग्रामविकासअधिकारी व ग्रामसेवक याच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना द्यावे, काही कामे एकत्रित करून (क्लब)टेंडर करतात त्यात 33:33:34च्या प्रमाणे कामाचे समान वाटप होत नाही हीफक्त मोजक्या ठेकेदाराला काम मिळण्यासाठी केलेली उपयोजना आहे या संदर्भात चौकशी करावी
तसेच बी १ निविदा प्रसिद्ध करतांना त्याची जाहिरात जास्त खापाच्या दैनिकातुन प्रसिद्ध करावी साप्ताहिक किंवा फक्त जाहिराती साठी मोजके अंक प्रसिद्ध करणाऱ्या वृत्तपत्रात देऊनये असे आदेश पारित करावे अन्यथा आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असेही निवेदनात म्हटले आहे,
निवेनावर जिल्हाध्यक्ष नितीन पटारे, जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र लांबे, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश सातपुते, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष विजय बडाख, जिल्हा संघटक दादा बडाख, जिल्हा सरचिटणीस प्रवीण देवकर, श्रीरामपूर शहराध्यक्ष शरद बोंबले, शेतकरी आघाडी प्रमुख निलेशदादा बनकर, जिल्हासंपर्क प्रमुख सुहास निर्मळ, अनिल तळोले, विनोद पानसरे, अमोल ढोले, पवन चव्हाण, प्रशांत चव्हाण, प्रसाद वाणी, संतोष गायधने, आदींच्या सह्या आहेत.