साईकिरण टाइम्स | १५ नोव्हेंबर २०२०
वाकडी (प्रतिनिधी) राहता तालुक्यातील खंडोबाची वाकडी येथील खंडेराय मूर्ती स्थापना वर्धापन सोहळा यंदा सायंकाळ ऐवजी सकाळी आठ ते अकरा या मर्यादित वेळेत साजरा होणार आहे.
कोरोना आजारामुळे यंदाचा सोहळा रद्द केला होता; मात्र, महाराष्ट्र सरकारच्या नुकत्याच झालेल्या निर्णयानुसार सोमवार पासून मंदिरे खुली होणार आहे. त्यामुळे वाकडी येथील तिसावा खंडोबा मूर्ती वर्धापण (भाऊबीज उत्सव)उत्सव सोमवार १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळ ऐवजी सकाळी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
वाकडी येथील खंडेराय मंदिर मधील मूर्ती स्थापना वर्धापन सोहळा येथील रामनाथ बाबा कोते यांच्या संकल्पनेतुन दरवर्षी मोठया उत्साहात साजरा होत असतो. यावेळी हा उत्सव सायंकाळ ऐवजी सकाळी मर्यादित वेळेत होणार असल्यामुळे येणाऱ्या भाविकांनी तोंडाला मास्क वापरून सुरक्षित अंतर ठेऊन घट स्थापना करावी, असे आवाहन दत्तात्रय रामनाथ कोते, खंडेराय देवस्थान ट्रस्ट, वाकडी ग्रामपंचायत सरपंच डॉ संपतराव शेळके, कोरोना समिती, भाऊबीज मित्र मंडळ, जय मल्हार प्रेस क्लब व वाकडी ग्रामस्थ यांच्याकडून करण्यात आले आहे.