साईकिरण टाइम्स | 15 ऑक्टोबर 2020
हुकूमशाही केंद्र सरकार विरुद्ध शेतकरी बचाव रॅलीद्वारे शेतकरी व कामगार विरोधी कायदे महाराष्ट्रात आडविण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर शेतकरी बचाव रॅलीचे आयोजन आज करण्यात आले होते, त्या पार्श्वभूमीवर संगमनेर येथे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी ज्येष्ठ नेते एच के पाटील, प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण खासदार राजीव सातव, वामशी चंद्र रेड्डी, आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार लहू कानडे यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी बचाव रॅली संपन्न झाली. रॅलीचे प्रक्षेपण सोशल मीडियाद्वारे करण्यात आले. महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी ऑनलाइन सहभाग नोंदवत केंद्र सरकारचा निषेध केला.
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात आमदार लहु कानडे, युवा नेते करण ससाणे व जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुयोग मंगल कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रमाला केंद्र सरकारच्या शेतकरी व कामगार विरोधी कायद्याचा विरोध करण्यासाठी काँग्रेस समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी बचाओ रॅलीत सहभागी होण्यासाठी डेन केबल नेटवर्कच्या एस न्यूज चॅनेलद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. यावेळी युवक काँग्रेसचे महासचिव करण ससाणे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, उपाध्यक्ष इंधनाथ पाटील थोरात, सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब दिघे, जिल्हा काँग्रेसचे सचिव बाबासाहेब कोळसे, जिल्हा परिषद सदस्य मंगलताई अशोक पवार पंचायत समिती सदस्य डॉ. वंदनाताई मुरकुटे, सुभाष तोरणे, जेष्ठ पत्रकार रमेश कोठारी, प्रेमचंद कुंकुलोक, दीपक कदम यांच्यासह काँग्रेसच्या विविध आघाड्या व सेलचे प्रमुख उपस्थित होते.