साईकिरण टाइम्स | 12 ऑक्टोबर 2020
बेलापूर (प्रतिनिधी) राज्यात वाढलेल्या महिलांवरील अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर 12 अॉक्टोबर रोजी ' उद्धावा जागे व्हा ' या टॕग लाईन खाली भारतीय जनता पार्टीच्यावतीने राज्यभर आंदोलन केले जात आहे. त्या अनुषंगाने बेलापूर भाजपाचेवतीने महिला अत्याचारांच्या निषेधार्थ येथील मंंडलाधीकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी भाजपाचे तालुका अध्यक्ष बबन मुठे , सामाजिक मंचचे विष्णूपंत डावरे , संघटन सरचिटणीस पुरुषोत्तम भराटे यांनी राज्यात वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांचा तिव्र निषेध केला. त्याचप्रमाणे गुन्हेगारांना कठोरात कठोर शासन करावे, या मागणीचे निवेदन मंडल अधिकाऱ्यांना दिले. यावेळी मंंडलाधीकारी डी.डी.गोसावी यांच्यावतीने कामगार तलाठी के.डी.खाडे यांनी सदरचे निवेदन स्वीकारले .
याप्रसंगी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सुनिल वाणी , तालुकाध्यक्ष बबन मुठे , विष्णूपंत डावरे , संतोष हरगुडे , रामभाऊ तरस , रुपेश हरकल , पुरुषोत्तम भराटे , राकेश कुंभकर्ण , सागर ढवळे , किशोर खरोटे , राहूल माळवदे , आसाराम जाधव , प्रशांंत ढवळे , उषाताई कुंभकर्ण , जया भराटे , माधुरी ढवळे , सुमनबाई शेटे , सुनिता गायकवाड , अलका सत्रे , माधुरी सत्रे , कुसूमबाई वैद्य , राधाबाई चव्हाण , रंभाबाई जावणे आदि भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.